Join us

निंबोळा गावाच्या शिवारातील शेतात पुरून ठेवलेल्या रासायनिक खताच्या दोन हजार बॅग जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 1:33 PM

पिकांसाठी घातक असलेल्या पोटॅश या रासायनिक खताच्या १६ लाख रुपये किमतीच्या दोन हजार बॅग जालना जिल्ह्यातील निंबोळा (ता. भोकरदन) गावच्या शिवारात असलेल्या शेतात खड्डा करून पुरून ठेवण्यात आल्या होत्या. कृषी विभागाच्या पथकाने गुरुवारी पंचनामा करून त्या बॅग जप्त केल्या.

पिकांसाठी घातक असलेल्या पोटॅश या रासायनिक खताच्या १६ लाख रुपये किमतीच्या दोन हजार बॅग जालना जिल्ह्यातील निंबोळा (ता. भोकरदन) गावच्या शिवारात असलेल्या शेतात खड्डा करून पुरून ठेवण्यात आल्या होत्या. कृषी विभागाच्या पथकाने गुरुवारी पंचनामा करून त्या बॅग जप्त केल्या. या प्रकरणात शनिवारी भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश रंगनाथ गवते (रा. म्हसोबानगर, जळगाव टी-पॉइंट, छत्रपती संभाजीनगर मूळ रा. पिंपळगाव सराई, ता. चिखली), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. गणेश गवते याने डिवी (ता. कारंजना, जि. वडोदरा, गुजरात) या ठिकाणी रासायनिक खत तयार करण्याचा कारखाना सुरू केला असून, या कारखान्यातून त्यांनी पोटॅश खतनिर्मिती केली. ते खत विविध दुकानदारांना विक्री केले.

त्या खतामुळे मात्र सिल्लोड, परतूर, फुलंब्री, खुलताबाद या तालुक्यांतील सुमारे ४०० एकर क्षेत्रांवरील अद्रक, कपाशी आदी पिके उगलीच नाहीत. त्यामध्ये अद्रक पिकाची शेती मोठ्या प्रमाणात आहे. हे खत दुकानदारांमार्फत शेतकऱ्यांना देण्यात आले. शेतकऱ्यांनी हे खत पिकांना टाकले असता उभी पिके जळाली.

काही ठिकाणी पीक उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर गणेश गवते याने त्याच्याकडे असलेल्या ५० किलो वजनाच्या दोन हजार बॅग निंबोळा शिवारातील शेतात खड्डा करून पुरल्या व काही बॅग विहिरीत टाकून दिल्या.

मात्र, याची गावात चर्चा झाली व प्रकरण कृषी विभागाकडे आले. पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी राजेश तांगडे यांनी गुरुवारी घटनास्थळाचा पंचनामा करून बॅग जप्त केल्या. या प्रकरणात गणेश रंगराव गवतेविरुद्ध भोकरदन पोलिस ठाण्यात १९५५चे कलम ३, ७ व पर्यावरण अधिनियमअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खतामुळे पीक जळून गेल्याचे सांगतात शेतकरी

• सदर पोटॅश खत उत्पादन करण्यासाठी गणेश गवते याने गुजरात सरकारचा परवाना घेतला आहे. शिवाय महाराष्ट्र सरकारचा खतविक्रीचा परवाना घेतला आहे. मात्र, त्यांनी छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यांत जे खत विक्री केले आहे, त्याबाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आलेल्या आहेत.

• परतूर तालुक्यातील सातोना येथील शेतकऱ्याने या खतामुळे कपाशीचे पीक जळून गेल्याचे सांगितले. त्यामध्ये निबोळा येथे पुरून टाकल्याची माहिती मिळाली. काही बॅग जमिनीत

• त्यामुळे आमच्या पथकाने या ठिकाणी जाऊन दोन हजार बॅग जप्त केल्या असून, त्याची किमत १६ लाख रुपयांच्या जवळपास असल्याचे पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी राजेश तांगडे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांचे नुकसान

• गणेश गवते याने आमची फसवणूक करून हे खत मला दिले व मी हे खत शेतकऱ्यांना विक्री केले.

• मात्र, त्यामुळे फुलंब्री, सिल्लोड, खुलताबाद या तालुक्यांतील सुमारे ४०० एकर क्षेत्रांवरील अद्रकचे पीक उगविले नाही. या खतामुळे ते जमिनीतच सडले आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या व आम्ही गणेश गवते याला सांगितल्या.

• मात्र, तुम्हाला काय करायचे ते करा, असे उद्धटपणे बोलून तो आता आमचा फोन उचलत नाही, असे खुलताबाद तालुक्यातील लक्ष्मण काळे यांनी सांगितले.

हेही वाचा - Dashparni Arka बहूपयोगी सेंद्रिय कीटकनाशक 'दशपर्णी अर्क' असे करा घरच्याघरी

टॅग्स :खतेपोलिसजालनाशेतकरीशेतीशेती क्षेत्रमराठवाडापीक व्यवस्थापन