Lokmat Agro >शेतशिवार > उजनी धरण पातळी १३ टक्क्यांवरून १६ टक्क्यांवर

उजनी धरण पातळी १३ टक्क्यांवरून १६ टक्क्यांवर

Ujani dam level from 13 percent to 16 percent | उजनी धरण पातळी १३ टक्क्यांवरून १६ टक्क्यांवर

उजनी धरण पातळी १३ टक्क्यांवरून १६ टक्क्यांवर

उजनी धरण पावसाळा चालू होऊन तीन महिने झाले तरी अद्यापि १६ टक्केच भरले असून उपयुक्त साठा फक्त आठ टीएमसी एवढाच झाला आहे.

उजनी धरण पावसाळा चालू होऊन तीन महिने झाले तरी अद्यापि १६ टक्केच भरले असून उपयुक्त साठा फक्त आठ टीएमसी एवढाच झाला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

चालू वर्षी ३६ टक्के मायनस झालेल्या सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण पावसाळा चालू होऊन तीन महिने झाले तरी अद्यापि १६ टक्केच भरले असून उपयुक्त साठा फक्त आठ टीएमसी एवढाच झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत असून आता फक्त दमदार पाऊस पडण्याची गरज आहे.

चालूवर्षी उजनी धरणातील जलसाठा बारा ते बावीस ऑगस्ट दरम्यान १३ टक्क्यांवरच रेंगाळत होता. तो मागील दहा दिवसांत वाढवून १६ टक्के झाला आहे. ऐन पावसाळ्याचे दिवस असूनही दहा दिवसांत केवळ तीन टक्के वाढ झाली आहे. यामुळेच शेतकऱ्याची चिंता अधिक वाढली आहे.

मागील पावसाळ्यात उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरून घेतले जाते तेव्हा धरणात १२३ टीएमसी एवढा प्रचंड जलसाठा असतो. मागील वर्षी १३ टक्के मायनस झालेले धरण चालू वर्षी मात्र ३६ टक्के मायनस झाले होते. मागील वर्षीच्या तुलनेत २३ टक्के जादा मायनस झालेला जलसाठा व चालूवर्षी लांबलेला पाऊस यामुळे पावसाळ्यातील तीन महिने संपले तरी धरण अद्याप १६ टक्केच भरले आहे. त्यातच जिल्ह्यातही पावसाने पाठ फिरवल्याने उजनीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या लाखो एकर क्षेत्रावरील हातातोंडाशी आलेली उभी पिके जळून जाऊ लागली आहेत. असे असले तरी पाणी सोडण्याचा निर्णय शासनस्तरावर पाच सप्टेंबरनंतरच होणार आहे.

मागील दोन दिवस पावसाचे वातावरण निर्माण झाले असून पुणे जिल्ह्यातील चासकमान, कळमोडी भामा आसखेड, वडवळे, पवना, कासारसाई या धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. उजनी धरण क्षेत्रातील दहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दौंड येथून येणाऱ्या निसर्गाची थोडी वाढ झाली आहे. उजनी धरणाच्या वरील बाजूस असलेल्या १९ धरणांपैकी नव धरणे सुमारे शंभर टक्के भरले आहेत व दोन-तीन धरणे सोडता इतर धरणांतील ही जलसाठा समाधानकारक झाल्याने यापुढे पुणे जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्यास वरील धरणातून हे पाणी सरळ उजनीच्या दिशेने येणार आहे.

इन्फ्लो
बंडगार्डन  
७२९ क्युसेक
दौंड  २६९१ क्युसेक

धरणाची सद्य:स्थिती
एकूण पाणीपातळी
  ४९२.२१० मीटर
एकूण जलसाठा  ७२.३६ टीएमसी
उपयुक्त जलसाठा  ८.७० टीएमसी
टक्केवारी  १६.२३

Web Title: Ujani dam level from 13 percent to 16 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.