Lokmat Agro >शेतशिवार > खर्च परवडेना, मजूर मिळेना; शेती ठेक्याने देण्याकडे वाढतोय शेतकऱ्यांचा कल

खर्च परवडेना, मजूर मिळेना; शेती ठेक्याने देण्याकडे वाढतोय शेतकऱ्यांचा कल

Unable to afford expenses, unable to find labor; farmers are increasingly inclined to contract farming | खर्च परवडेना, मजूर मिळेना; शेती ठेक्याने देण्याकडे वाढतोय शेतकऱ्यांचा कल

खर्च परवडेना, मजूर मिळेना; शेती ठेक्याने देण्याकडे वाढतोय शेतकऱ्यांचा कल

कृषी प्रधान समजल्या जाणाऱ्या आपल्या देशात शेतीव्यवसाय बिनभरवशाचा बनला आहे. निसर्गाच्या सततच्या अवकृपेमुळे पीक उत्पादनासाठी केलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे.

कृषी प्रधान समजल्या जाणाऱ्या आपल्या देशात शेतीव्यवसाय बिनभरवशाचा बनला आहे. निसर्गाच्या सततच्या अवकृपेमुळे पीक उत्पादनासाठी केलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कृषी प्रधान समजल्या जाणाऱ्या आपल्या देशात शेतीव्यवसाय बिनभरवशाचा बनला आहे. निसर्गाच्या सततच्या अवकृपेमुळे पीक उत्पादनासाठी केलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे.

त्यात कोणत्याही बाजारभावाची शाश्वती नसल्याने शेती इतरांना ठेक्याने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसत आहे.

पूर्वी वेळेवर पाऊस पडायचा, उन्हाळ्यातील विहिरी, नद्या-नाले यांना पाणी राहायचे. शेतकरी उन्हाळी पिके घ्यायची; परंतु अमर्याद वृक्षतोड आणि वाढते प्रदूषण, तापमान यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत गेला.

आता शेणखत मिळेना, उत्पादन वाढलेक्षमतेत घट झाली. पूर्वी शेतकऱ्यांकडे भरपूर गोधन असायचे. त्यापासून शेणखत, शेतात राबण्यासाठी बैल, घरी दुग्धजन्य पदार्थांची कमी नसायची.

मात्र, अलीकडच्या काळात चारा-पाण्याची टंचाई, राखणाऱ्या गड्याची मजुरी परवडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी गोधन विकले आहे. आता शेतकऱ्यांनाही पॅकेटचे दूध विकत घेऊनच चहा बनवावा लागतो.

शेतीची पोत टिकवायला शेणखत नाही. त्यामुळे जमिनीचा कस कमी होत आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेती करणे दिवसेंदिवस तोट्याचे ठरत आहे.

वर्षभर राब राब राबून शेवटी पदरी निराशाच
-
शेतीसाठी आवश्यक असलेल्या बैलजोडीच्या किमतीही लाखावर पोहोचल्या आहेत.
- शेतमजुरांचीही कमतरता असल्याने मजुरीहीतही वाढ झाली आहे.
- बियाणे, खते, कीटकनाशक, तणनाशक यांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.
- या सर्वांचा विचार करून वर्षभर राब राब राबून शेवटी पदरी निराशाच येत आहे.
- शेती व्यवसाय बिनभरवशाचा बनला आहे, असे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. 

ठेक्याने शेती देणे म्हणजे काय?
ठेक्याने शेती देणे ही भारतात, विशेषतः महाराष्ट्रात, प्रचलित असलेली शेती करण्याची एक पद्धत आहे. यामध्ये, जमिनीचा मालक जमिनीचा वापर करण्याचा अधिकार एखाद्या व्यक्तीला (ज्याला ठेकेदार म्हणतात.) ठराविक रकमेसाठी (ज्याला ठेका म्हणतात.) देतो. ठेकेदार ठरलेल्या कालावधीसाठी जमिनीवर शेती करतो आणि त्या बदल्यात ठेक्याची रक्कम जमिनीच्या मालकाला देतो.

बागायती क्षेत्रात घट
-
बागायती क्षेत्रात घट होत आहे. कारण दोन वर्षात परतीच्या मुसळधार पावसाने, पिके हातची गेली, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला.
- बहुतांश शेतकऱ्यांनी बँका किंवा पतसंस्थाकडून शेतीसाठी कर्ज घेतले आहे. यंदा टोमॅटो, कांदा, पिकातून खर्च निघणेही अवघड असल्याने कर्ज कसे फेडायचे? असा प्रश्न आहे.

वाचा सविस्तर: अल्पभूधारक शेतकरी नेताजी झाला सहा एकर जमिनीचा मालक; शेतीतून अजून काय मिळविले? वाचा सविस्तर

Web Title: Unable to afford expenses, unable to find labor; farmers are increasingly inclined to contract farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.