यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२५ हा १ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. या अर्थसंकल्पात सरकारचे बाजार भांडवल सुमारे १५% ने वाढवून सुमारे २० अब्ज डॉलर्स करण्याची योजना आहे.
ही मागील सहा वर्षातील सर्वात मोठी वाढ आहे. अशी माहिती दोन सरकारी सूत्रांनी वृत्तसंस्था रॉयटर्सला दिली आहे. या वाढीमुळे शेतकऱ्यांचे (Farmer) उत्पन्न वाढेल आणि महागाई नियंत्रणात येईल, अशी आशा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिरिक्त रोख रक्कम उच्च उत्पादन देणारे बियाणे (Seeds) विकसित करण्यासाठी, साठवणूक आणि पुरवठा पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी आणि डाळी (Pulses), तेलबिया पिके (Oil seed Crops), भाज्या (Vegetables) आणि दुग्धजन्य पदार्थांचे (Milk Products) उत्पादन वाढवण्यासाठी वापरली जाणार आहे.
भारत हा गहू आणि साखर उत्पादनात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे आणि तरीही अन्नधान्याच्या वाढत्या किमतींचा सामना करावा लागत आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये हे प्रमाण वर्षानुवर्षे १०% पेक्षा जास्त झाले. गेल्या दशकात सरासरी ६% पेक्षा जास्त आहे.
महागाई रोखण्यासाठी सरकारने गव्हासह काही कृषी उत्पादनांवर निर्यात निर्बंध लादले आहेत आणि काही डाळींच्या जातींसाठी शुल्कमुक्त आयात धोरण (Import policy) वाढवले आहे.
एप्रिलपासून सुरू होणाऱ्या या आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये कृषी आणि संलग्न उपक्रमांसाठी एकूण वाटप सुमारे १.७५ ट्रिलियन रुपये (२०.२ अब्ज डॉलर्स) होण्याची शक्यता आहे, जे चालू आर्थिक वर्षात १.५२ ट्रिलियन रुपये होते.
कृषी कर्ज मर्यादा वाढवण्याची मागणी
यंदाच्या अर्थसंकल्पात अनुदानित कृषी कर्जाची मर्यादा प्रति शेतकरी ३,००,००० रुपयांवरून ५,००,००० रुपये करण्याची आणि पीक विम्याचा विस्तार करण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.
डाळींच्या उत्पादन वाढीवर भर
सरकार २०३० पर्यंत डाळींचे उत्पादन ३० दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्याची आणि पुढील पाच वर्षांत मत्स्यपालन क्षेत्रात ९ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. या योजनांमध्ये २०२७ पर्यंत अन्न प्रक्रिया कंपन्यांना एकूण १०७ अब्ज रुपयांचे प्रोत्साहन देण्याचाही समावेश असेल.
महागाई रोखण्यासाठी अव्हान
महागाई रोखण्यासाठी सरकारने गव्हासह काही कृषी उत्पादनांवर निर्यात निर्बंध लादले आहेत आणि काही डाळींच्या जातींसाठी शुल्कमुक्त आयात धोरण वाढवले आहे.