Lokmat Agro >शेतशिवार > Unique code for Hapus Mango : हापूस आंब्याची बोगस विक्री थांबविण्यासाठी युनिक कोड कसे काम करणार?

Unique code for Hapus Mango : हापूस आंब्याची बोगस विक्री थांबविण्यासाठी युनिक कोड कसे काम करणार?

Unique code for Hapus Mango : How will the unique code work to stop the bogus sale of Hapus Mango? | Unique code for Hapus Mango : हापूस आंब्याची बोगस विक्री थांबविण्यासाठी युनिक कोड कसे काम करणार?

Unique code for Hapus Mango : हापूस आंब्याची बोगस विक्री थांबविण्यासाठी युनिक कोड कसे काम करणार?

आंब्याला चांगला दर मिळण्यासाठी व देवगड हापूसच्या नावाखाली अन्य आंबा विक्रीला आता युनिक कोडमुळे लगाम लागणार आहे.

आंब्याला चांगला दर मिळण्यासाठी व देवगड हापूसच्या नावाखाली अन्य आंबा विक्रीला आता युनिक कोडमुळे लगाम लागणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

देवगड हापूस आंब्याचे उत्पादन यावर्षी समाधानकारक राहील, असा अंदाजही वर्तविला जात आहे. यामुळे या आंब्याला चांगला दर मिळण्यासाठी व देवगड हापूसच्या नावाखाली अन्य आंबा विक्रीला आता युनिक कोडमुळे लगाम लागणार आहे.

या युनिकोडचा फायदा बोगस आंबा विक्रीला आळा बसून देवगड हापूसला भाव मिळून देणारा ठरणार आहे.

असे मिळणार युनिक कोड
१) हे युनिक कोड संस्थेमार्फत वितरित केले जाणार असून, या युनिक कोडचा बोगस वापर होऊ नये, त्याकरिता शेतकऱ्यांना त्यांची देवगड तालुक्यातील आंबा कलमे त्यांच्या सातबारा उताऱ्यावर तपासून आणि त्यांची उत्पादन क्षमता बघून तितकेच कोड मिळणार आहेत.
२) असे कोड मिळण्याकरिता प्रत्येक शेतकरी जीआयधारक असायला हवा. आंब्यासाठी वापर होण्याचे हे पहिले वर्ष असल्याने या कोडचे स्टिकर छापून तयार होण्याकरिता आणि त्यांची सिस्टीममध्ये सुरुवात होण्याकरिता सुमारे ४५ दिवस लागणार आहे.
३) त्यामुळे १० जानेवारी २०२५ च्या आत शेतकऱ्यांनी संस्थेकडे संपर्क साधून नोंदणी करावी आणि कोडची ऑर्डर नोंदवावी.

युनिक कोडचा वापर कसा होणार?
-
सन सोल्यूशन या कंपनीला मिळालेले पेटंट हे नक्कल न होणाऱ्या आणि एकदाच वापर होणाऱ्या कोडसाठी मिळाले आहे.
यामध्ये प्रत्येक कोड हा दोन भागांत केलेल्या स्टीकरच्या माध्यमात असतो. त्या कोडचा एक भाग स्टीकरच्या खाली असतो.
तो भाग वाचण्याकरिता स्टीकर काढल्यास त्याचे आपोआप दोन तुकडे होतात, ज्यामुळे स्टीकर पुन्हा वापरता येत नाही.
शेतकऱ्यांनी प्रत्येक आंब्याला असे स्टीकर लावायचे आहे.

परदेशातील निर्यात राजरोसपणे चालू
• जीआय प्राधिकरणाने देवगड आणि रत्नागिरी हापूसला जाहीर केलेले जीआय मानांकन परत घेऊन दोन्ही अर्ज २००८ सालच्या हापूस या जीआयच्या अर्जात एकत्रित केले होते.
• त्यावेळी भिडे आणि साळवी यांनी प्रोसेसिंगचा आंबा मोठ्या प्रमाणात हापूस या नावाने प्रदेशात एक्सपोर्ट होत आहे. आणि त्याला आळा घालण्याच्या दृष्टीने कोकणाच्या हापूसला एकत्रित जीआय मिळायला हवा असा युक्तिवाद केला होता.
• परंतु जीआय मिळाल्यानंतर परदेशात एक्सपोर्ट राजरोसपणे चालू आहे. आणि त्याला कोणताच आळा बसलेला नाही त्यामुळे देवगडच्या शेतकऱ्यांना आपली फसगत झाल्याची भावना निर्माण होत आहे आणि त्यामुळे देवगड हापूसच्या स्वतंत्र जीआय साठी पुन्हा एकदा संस्थेने प्रयत्न करावे, अशी मागणी देवगडच्या हापूस आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

बागायतदार अजूनही उदासीन
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदार अजूनही जीआय मानांकनासाठी नोंदणी करण्याबाबत उदासीन आहेत. हापूसच्या नावाखाली इतर आंब्याची विक्री होऊ नये आणि हापूस बागायतदारांना त्यांच्या मेहनतीइतका लाभ व्हावा, ग्राहकांची फसवणूक होऊ नये, यासाठी जीआय मानांकन आणि त्यानंतर युनिकोड घेणे गरजेचे आहे.

ग्राहकांना युनिक कोडचा वापर कसा करता येणार?
१) ग्राहकांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून साध्या सोप्या पद्धतीने आंब्याची तपासणी होणार आहे.
२) यासाठी सन सोल्यूशनच्या अँटी-काउंटर फिटिंग व्हॉट्सअॅपच्या नंबरवर ग्राहकांनी स्टीकरचा फोटो पाठवावा 
३) नंतर ही यंत्रणा त्या स्टीकरवरील कोड वाचते आणि स्टीकरच्या खालच्या बाजूला असलेल्या कोडचा भाग पाठवा, असा मेसेज पाठवते.
४) मग ग्राहकांनी तो कोड लिहून पाठवल्यानंतर आंब्याच्या संदर्भातील मेसेज यंत्रणेकडून येतो.
५) या मेसेजमध्ये शेतकऱ्यांना हवा तसा मेसेज पाठवता येईल, जसे की शेतकऱ्यांचे नाव, गावाचे नाव, जीआय क्रमांक आदी मुद्दे पाठवता येतील.
६) जेणेकरून ग्राहकांना आंब्याबाबतची इत्थंभूत माहिती मिळेल आणि आपण खात असलेला आंबा १०० टक्के खात्रीचाच देवगड हापूस आहे, याची खात्री देईल.

Web Title: Unique code for Hapus Mango : How will the unique code work to stop the bogus sale of Hapus Mango?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.