Lokmat Agro >शेतशिवार > मधमाशांमुळे पीक उत्पादनात 40 टक्क्यांपर्यंत वाढ, नेमकं गणित काय? 

मधमाशांमुळे पीक उत्पादनात 40 टक्क्यांपर्यंत वाढ, नेमकं गणित काय? 

Up to 40 percent increase in crop production due to bees, what exactly is the math? | मधमाशांमुळे पीक उत्पादनात 40 टक्क्यांपर्यंत वाढ, नेमकं गणित काय? 

मधमाशांमुळे पीक उत्पादनात 40 टक्क्यांपर्यंत वाढ, नेमकं गणित काय? 

मधमाशांमुळे होणाऱ्या परागीभवनाद्वारे पीक उत्पादनात 5 ते 40 टक्के वाढ होते.

मधमाशांमुळे होणाऱ्या परागीभवनाद्वारे पीक उत्पादनात 5 ते 40 टक्के वाढ होते.

शेअर :

Join us
Join usNext

निसर्गाचा जैविक समतोल साधण्याची किमया परागीभवनात असते. यात सर्वात जास्त हातभार हा मधमाशांचा लागतो. शिवाय आहारातील एक तृतीयांश भाग हा पिकांच्या परागीभवनाद्वारे मिळत असतो. मधमाशांमुळे होणाऱ्या परागीभवनाद्वारे पीक उत्पादनात 5 ते 40 टक्के वाढ होते. त्यामुळे मधमाशांबद्दल जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राहुरी कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सी. एस. पाटील यांनी केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित मध महोत्सवातीलशेती व मधमाशापालन या विषयावरील परिसंवादात अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. यात सातारा जिल्ह्यातील बोरगाव येथील स्वाती गुरवे, ठाणे जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्र कोसवाड येथील उत्तम सहाणे सहभागी झाले होते. डॉ.पाटील म्हणाले की, आहारातील एक तृतीयांश भाग परागीभवनाद्वारे मिळतो. परागीभवनाची प्रक्रिया होण्यासाठी राज्यात नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थिती पूरक आहे. मधमाशांद्वारे होणाऱ्या परागीभवनामुळे 5 ते 40  टक्क्यांपर्यंत पीक उत्पादनात वाढ झाली आहे. उत्पादनांची गुणवत्ता राखून उत्पन्न अधिक पौष्टिक होते, असेही संशोधनात पुढे आले आल्याचे पाटील म्हणाले.

यावेळी बोलताना गुरवे यांनी विविध फळे, भाज्या, धान्य, तेलबिया आणि इतर पिकांमध्ये परागीभवनाची प्रक्रिया होते. निसर्गाचा जैविक समतोल साधण्याची किमया परागीभवनात असते. यात सर्वात जास्त हातभार हा मधमाशांचा लागतो. तसेच पिकांना कीटकांपासून वाचविण्यातही मदत होत असते. मधमाशांमुळे परागीभवन झाल्यामुळे पीक उत्पादनात वाढ होणारी  पिके आहेत. तेलवर्गीय मोहरीत 43 टक्के, सूर्यफुलात 32 ते 48 टक्के, करडईत 28 टक्के, तीळ 22 ते 37, सोयाबीन 19 टक्के, एरंडी 30, जवस 17 ते 40, नायगर 22 टक्के उत्पादन वाढ झाल्याचे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे. मधमाशांमुळे मिळणारे मध हे सर्वात पौष्टिक अन्न मानले जाते. 

मधमाशींच्या पोळ्याचे संगोपन

डोळ्यासाठी हितकारक, स्वरामध्ये सुधारणा, बुद्धीधारणक्षमता वाढविणारा म्हणून मधाची ओळख आहे. खोकला, पित्त, कफ, क्षय, कर्करोग, मधुमेह, ह्दयरोग, मळमळ यावर मध गुणकारी आहे. तसेच भूक वाढविण्यासाठीही तो उपयुक्त आहे. मधमाशांच्या संवर्धनासाठी आपण फुले देणाऱ्या झाडांची लागवड करण्याबरोबरच सेंद्रीय शेतीला प्राधान्य दिले पाहिजे. मधमाशांना आकर्षित करणाऱ्या पिकांची लागवड करून शेतात किमान एक तरी मधमाशी वसाहत असावी अशी व्यवस्था केली पाहिजे. कीटकनाशके, बुरशीनाशके आणि तणनाशकांचा कमीत कमी वापर केला पाहिजे. शेतात असलेल्या मधमाशींच्या पोळ्याचे संगोपन केले पाहिजे. तसेच प्रतिकूल हवामान असल्यास मधमाशी पेट्यांची काळजी घेण्याची गरज आहे, असेही त्या म्हणाल्या.

25 एकरांवरील जंगल नष्ट होईल... 

सहाणे यांनी मधमाशी अर्धा ते एक किलोमीटर भागात फिरून एक पोळी तयार करते, हे सांगतांना फुलोरी मधमाशी हे परागीभवणासाठी अत्यंत उपयुक्त आहे, असे सांगितले. मधमाशीचे एक पोळे नष्ट करणे म्हणजे त्या शेत शिवारातील उभे पिक नष्ट करण्यासारखे आहे. तसेच आग्या पोळ्यामध्ये पन्नास हजार ते एक लाख मधमाशा असतात. जाळ करून किंवा धूर करून माशा उडवल्या आणि मध काढला तर जवळपास 25 एकर मधील जंगल नष्ट होते. त्यामुळे मध काढण्याची शास्त्रीय पद्धत अवलंबवावी. मधाच्या पोळ्यामध्ये मध असलेला भाग फुगीर होतो. तेवढा भाग वेगळा काढून आपण मधमाशीचे पोळे वाचवू शकतो. पुन्हा ते पोळे पूर्ववत लावल्यास बाहेर गेलेल्या माशा त्यावर परत येतात, असेही ससाणे यांनी सादरीकरणाद्वारे सांगितले.

पिकांच्या व्यवस्थापनापासून ते योजनापर्यंत, कृषि विषयक सर्व अपडेट्ससाठी लोकमत Agro चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा…

Web Title: Up to 40 percent increase in crop production due to bees, what exactly is the math?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.