पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यूपीएससी) २०२५ मध्ये होणाऱ्या नागरी सेवा परीक्षेसह विविध पदांसाठी भरती परीक्षांचे वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
संयुक्त जिओ-सायंटिस्ट, इंजिनिअरिंग सव्हिसेस, सीबीआय, सीआयएसएफ, एनडीए, सीडीएस, आयईएस/आयएसएस आणि इतर परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार नागरी सेवा आणि भारतीय वनसेवा पूर्वपरीक्षा-२०२५ साठी २२ जानेवारी ते ११ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत नोंदणी करता येईल.
२५ मे रोजी पूर्वपरीक्षा होईल. नागरी सेवा मुख्य परीक्षा २२ ऑगस्ट तसेच वनसेवा मुख्य परीक्षा १६ नोव्हेंबरला सुरू होईल. अभियांत्रिकी सेवा प्राथमिक परीक्षेसाठी १८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत अर्ज करता येतील. दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी पूर्वपरीक्षा होईल. २६ जूनला मुख्य परीक्षा पार पडेल.
संयुक्त जीओ सायंटिस्ट पूर्वपरीक्षा ९ फेब्रुवारी २०२५ रोजी, तर मुख्य परीक्षा दि. २१ जून रोजी आहे. संयुक्त वैद्यकीय सेवापरीक्षा २० जुलैला होणार आहे.
एनडीए प्रवेश परीक्षा एप्रिल महिन्यात
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी (एनडीए/एनए) परीक्षा आणि कम्बाइड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस) परीक्षांसाठी ११ ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान नोंदणी करता येईल. परीक्षा १३ एप्रिल २०२५ रोजी घेण्यात येईल.