सांगली : जिल्ह्यातील यंदाचा १५ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला असून दोन साखर कारखान्यांचे गळीत हंगाम या आठवड्यात बंद होतील.
१७ साखर कारखान्यांनी ७७ लाख ६३ हजार टन उसाचे गाळप करत ८१ लाख ६६ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. यंदाचा कारखान्यांचा गाळप हंगाम साडे तीन ते चार महिन्यात आटोपला आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात साखरेचे उत्पादन पाच ते १० लाख क्विंटलने घटणार असल्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्यात यंदाच्या ऊसाचा गाळप हंगामात १० सहकारी आणि सात खासगी साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला. यंदाचा हंगाम नोव्हेंबरच्या मध्यापासून सुरू झाला.
१७ साखर कारखान्यांनी ७७ लाख ६३ हजार ४०८ टन उसाचे गाळप केले असून ८१ लाख ६६ हजार ०८० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. जिल्ह्याचा साखर उतारा १०.५३ टक्के इतका आहे.
क्रांती साखर कारखान्याने सर्वाधिक उसाचे गाळप करत साखर उत्पादनात अग्रेसर ठरला आहे. हुतात्मा कारखाना उताऱ्यात पुढे आहे.
मागील २०२३-२४ च्या गळीत हंगामात १७ साखर कारखान्यांनी ८७ लाख ११ हजार ४०८ टन उसाचे गाळप केले होते. तसेच ९७लाख ८३ हजार २३९ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते.
गतवर्षी पावसाच्या दडीमुळे उसाची लागवड चांगलीच लांबणीवर पडली होती. त्यानंतर जून ते ऑक्टोबर या दरम्यान अतिवृष्टी, परतीचा पावसामुळे उसाची अपेक्षित वाढ अजिबात झाली व्याली नाही.
याचा मोठा फटका साखरेच्या उत्पादनावर झाला असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या साखर कारखान्यांचे गाळप हंगामात सुमारे ५ ते १० लाख क्विंटलने उत्पादन कमी होईल, अशी शक्यता आहे.
पावसाचा फटका
गतवर्षी प्रथम पावसाने ओढ दिल्याने लागवड लांबली. त्यानंतर जून ते ऑक्टोबर दरम्यान पावसामुळे उसाची वाढ खुंटली याचा फटका साखर उत्पादनावर बसला आहे.
जिल्ह्यातील कारखान्यांचे गाळप व उत्पादन खालीलप्रमाणे
साखर कारखाना | गाळप (टन) | उत्पादन (क्विंटल) | उतारा (टक्के) |
श्री दत्त इंडिया | ८२४८५५ | ८५१५१० | १०.३४ |
राजारामबापू युनिट साखराळे | ६६७४६५ | ७७९२०० | ११.७७ |
विश्वास चिखली | ४४३०१६ | ५३२७३० | १२.०१ |
हुतात्मा वाळवा | ४७०८५० | ५२३४७५ | १२.८५ |
राजारामबापू युनिट वाटेगाव | ३९८५९३ | ५०७६०० | १२.५ |
एस ई झेड तुरची | ४१३२० | २२८४० | ७.४८ |
राजारामबापू युनिट जत | २०५३६५ | २२६७०० | १०.३३ |
सोनहिरा, वांगी | ९५६३१० | ८७६०६० | ९.१२ |
क्रांती अग्रणी, कुंडल | ९७२६६० | १०६११२० | १२.१४ |
राजारामबापू युनिट कारंदवाडी | २९७८०० | ३६१७४० | १२.२९ |
मोहनराव शिंदे, आरग | ३१७९८५ | ३४५५०० | १०.९२ |
दालमिया, कोकरूड | ४५३५७४ | ५५९४३० | १२.२ |
यशवंत शुगर नागेवाडी | १६८२१० | १९३४५० | ११.३३ |
रायगाव शुगर | १४०६३० | १४३१०० | १०.७८ |
उदगिरी शुगर बामणी-पारे | ४९४८४१ | ३५९७०० | ७.१७ |
सदगुरू श्री श्री | ४८९१४४ | ३६४२५५ | ७.३७ |
श्रीपती शुगर, डफळापूर | ३२०७९० | ३५७६७० | ११.२४ |
एकूण | ७७६३४०८ | ८१६६०८० | १०.५३ |