Join us

Us Galap : सर्वाधिक उसाचे गाळप करत साखर उत्पादनात अग्रेसर ठरला हा कारखाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 09:11 IST

सांगली जिल्ह्यातील यंदाचा १५ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला असून दोन साखर कारखान्यांचे गळीत हंगाम या आठवड्यात बंद होतील.

सांगली : जिल्ह्यातील यंदाचा १५ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला असून दोन साखर कारखान्यांचे गळीत हंगाम या आठवड्यात बंद होतील.

१७ साखर कारखान्यांनी ७७ लाख ६३ हजार टन उसाचे गाळप करत ८१ लाख ६६ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. यंदाचा कारखान्यांचा गाळप हंगाम साडे तीन ते चार महिन्यात आटोपला आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात साखरेचे उत्पादन पाच ते १० लाख क्विंटलने घटणार असल्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यात यंदाच्या ऊसाचा गाळप हंगामात १० सहकारी आणि सात खासगी साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला. यंदाचा हंगाम नोव्हेंबरच्या मध्यापासून सुरू झाला.

१७ साखर कारखान्यांनी ७७ लाख ६३ हजार ४०८ टन उसाचे गाळप केले असून ८१ लाख ६६ हजार ०८० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. जिल्ह्याचा साखर उतारा १०.५३ टक्के इतका आहे.

क्रांती साखर कारखान्याने सर्वाधिक उसाचे गाळप करत साखर उत्पादनात अग्रेसर ठरला आहे. हुतात्मा कारखाना उताऱ्यात पुढे आहे.

मागील २०२३-२४ च्या गळीत हंगामात १७ साखर कारखान्यांनी ८७ लाख ११ हजार ४०८ टन उसाचे गाळप केले होते. तसेच ९७लाख ८३ हजार २३९ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले होते.

गतवर्षी पावसाच्या दडीमुळे उसाची लागवड चांगलीच लांबणीवर पडली होती. त्यानंतर जून ते ऑक्टोबर या दरम्यान अतिवृष्टी, परतीचा पावसामुळे उसाची अपेक्षित वाढ अजिबात झाली व्याली नाही.

याचा मोठा फटका साखरेच्या उत्पादनावर झाला असल्याचे चित्र आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या साखर कारखान्यांचे गाळप हंगामात सुमारे ५ ते १० लाख क्विंटलने उत्पादन कमी होईल, अशी शक्यता आहे.

पावसाचा फटकागतवर्षी प्रथम पावसाने ओढ दिल्याने लागवड लांबली. त्यानंतर जून ते ऑक्टोबर दरम्यान पावसामुळे उसाची वाढ खुंटली याचा फटका साखर उत्पादनावर बसला आहे.

जिल्ह्यातील कारखान्यांचे गाळप व उत्पादन खालीलप्रमाणे

साखर कारखानागाळप (टन)उत्पादन (क्विंटल)उतारा (टक्के)
श्री दत्त इंडिया८२४८५५८५१५१०१०.३४
राजारामबापू युनिट साखराळे६६७४६५७७९२००११.७७
विश्वास चिखली४४३०१६५३२७३०१२.०१
हुतात्मा वाळवा४७०८५०५२३४७५१२.८५
राजारामबापू युनिट वाटेगाव३९८५९३५०७६००१२.५
एस ई झेड तुरची४१३२०२२८४०७.४८
राजारामबापू युनिट जत२०५३६५२२६७००१०.३३
सोनहिरा, वांगी९५६३१०८७६०६०९.१२
क्रांती अग्रणी, कुंडल९७२६६०१०६११२०१२.१४
राजारामबापू युनिट कारंदवाडी२९७८००३६१७४०१२.२९
मोहनराव शिंदे, आरग३१७९८५३४५५००१०.९२
दालमिया, कोकरूड४५३५७४५५९४३०१२.२
यशवंत शुगर नागेवाडी१६८२१०१९३४५०११.३३
रायगाव शुगर१४०६३०१४३१००१०.७८
उदगिरी शुगर बामणी-पारे४९४८४१३५९७००७.१७
सदगुरू श्री श्री४८९१४४३६४२५५७.३७
श्रीपती शुगर, डफळापूर३२०७९०३५७६७०११.२४
एकूण७७६३४०८८१६६०८०१०.५३

अधिक वाचा: ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; एफआरपी देण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा हा मोठा निर्णय; वाचा सविस्तर

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीसांगलीपाऊसलागवड, मशागतपीक