Lokmat Agro >शेतशिवार > नॅनो खताचा वापर करा, उत्पादकता वाढवा

नॅनो खताचा वापर करा, उत्पादकता वाढवा

Use nano fertilizer, increase productivity | नॅनो खताचा वापर करा, उत्पादकता वाढवा

नॅनो खताचा वापर करा, उत्पादकता वाढवा

नॅनो खतांची फवारणी केल्यानंतर नत्र व स्फुरद झाडाच्या पानावरील, बिया व मुळाच्या पृष्ठभागावर असणाऱ्या छिद्रांच्या माध्यमातून आतमध्ये प्रवेश करते व पानांच्या पेशीमधील पोकळीमध्ये साठवले जाऊन पिकांच्या आवश्यकतेनुसार झाडाला उपलब्ध होते.

नॅनो खतांची फवारणी केल्यानंतर नत्र व स्फुरद झाडाच्या पानावरील, बिया व मुळाच्या पृष्ठभागावर असणाऱ्या छिद्रांच्या माध्यमातून आतमध्ये प्रवेश करते व पानांच्या पेशीमधील पोकळीमध्ये साठवले जाऊन पिकांच्या आवश्यकतेनुसार झाडाला उपलब्ध होते.

शेअर :

Join us
Join usNext

शास्त्रीय दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या मूल घटकांच्या पूर्तीसाठी रासायनिक खतांचा संतुलित वापर करून नॅनो खताचा वापर वाढवा. पिकांची उत्पादकता वाढण्यासाठी शेणखत, कंपोस्ट खत व जैविक खतांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे व कृषी विकास अधिकारी अजय शेंडे यांनी केले आहे.

नॅनो खतांची फवारणी केल्यानंतर नत्र व स्फुरद झाडाच्या पानावरील, बिया व मुळाच्या पृष्ठभागावर असणाऱ्या छिद्रांच्या माध्यमातून आतमध्ये प्रवेश करते व पानांच्या पेशीमधील पोकळीमध्ये साठवले जाऊन पिकांच्या आवश्यकतेनुसार झाडाला उपलब्ध होते. त्यामुळे नत्र व स्फुरद ही अन्नद्रव्ये विहित वेळेत योग्य त्या प्रमाणात पिकांना उपलब्ध होतात.

या नॅनो पद्धतीमुळे खतांचा संतुलित वापर होऊन जमीन हवा व पाणी या मूलभूत घटकांना प्रदूषण मुक्त ठेवता येते. लागवडीच्या खर्चात बचत होते व पिकांच्या भरघोस उत्पन्नाची हमी प्राप्त होते, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

नॅनो खताचा वापर कसा करावा?
-
पिकांच्या विविध अवस्थेत दोन वेळा फवारणी करून नत्र व स्फुरद या अन्न घटकांची पिकांना पूर्तता करून देणे शक्य आहे. दोन ते पाच मिलिलिटर नॅनो खते प्रतिलिटर पाण्यामध्ये मिसळून पिकाच्या प्रमुख वाढीच्या अवस्थेनुसार फवारणी करावी.
- नॅनो खतांच्या उत्तम परिणामासाठी पहिली फवारणी पिकाच्या फुटवे/फांद्या फुटण्याच्या अवस्थेमध्ये व दुसरी फवारणी पिकाच्या फुलोरा/शेंगा लागणे सात दहा दिवस अगोदर करावी.
- फवारणी सकाळच्या वेळेत कमी उन्हामध्ये आणि हवेच्या कमी वेगामध्ये करावी. पाणी पूर्ण ओली होण्यासाठी आणि नॅनो खते समप्रमाणात सर्वत्र मिसळण्यासाठी पंपाला फ्लॅट फॅन किंवा कट नोझल लावून फवारणी करावी. नॅनो युरिया/डीएपी फवारणीद्वारे द्यावे. ठिबक व वाहत्या पाण्यातून देण्यात येऊ नये.

दोन प्रकारची खते
भारत सरकारने नॅनो खते नॅनो युरिया (द्रवरूप) व नॅनो डीएपी (द्रवरूप) नवीन संशोधनाद्वारे शेतकन्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे. नॅनो युरिया व नॅनो डीएपी द्रवरूप हे ५०० मिली पॅकिंगमध्ये असून, नैनो युरियामध्ये ४ टक्के नत्राचे प्रमाण तसेच नॅनो डीएपीमध्ये ८ टक्के नत्र व १६ टक्के स्फुरद एकूण वजनाच्या प्रमाणात असते. नॅनो युरिया व डीएपीद्वारे पिकांना नत्र व स्फुरद फवारणीच्या माध्यमातून उपलब्ध होते.

Web Title: Use nano fertilizer, increase productivity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.