Lokmat Agro >शेतशिवार > कुंडीत माती भरण्यासाठी वापरा या सोप्या टिप्स

कुंडीत माती भरण्यासाठी वापरा या सोप्या टिप्स

Use these simple tips to fill pots with soil | कुंडीत माती भरण्यासाठी वापरा या सोप्या टिप्स

कुंडीत माती भरण्यासाठी वापरा या सोप्या टिप्स

लहरी निसर्गाचं गणित सांभाळत, हाताशी असलेल्या साहित्यात करा बागकाम...

लहरी निसर्गाचं गणित सांभाळत, हाताशी असलेल्या साहित्यात करा बागकाम...

शेअर :

Join us
Join usNext

घरात एखादा तरी हिरवा कोपरा असावा असं कोणाला वाटत नाही? यासाठी घराच्या परसदारात एखाद्या कुंडीपासून तुम्हाला सुरुवात करता येऊ शकते. स्वत:ची परसबाग फुलवायची असेल तर छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या बाबी माहीत असणं फार गरजेचे आहे.नव्याने रोपांची लागवड करत असाल तर कु्ंड्या किंवा वाफे भरण्याचे तंत्र जमले की पुढे लागवड करणं सोपं होतं. जाणून घेऊया कुंडीत माती कशी भरावी..

परसबागेत, गच्चीवर किंवा अगडी अपार्टमेंटच्या एखाद्या कोपऱ्यात तुम्हाला रोपं लावता येऊ शकतात. लहरी निसर्गाचं गणित सांभाळत हाताशी असलेल्या साहित्यात नवनवे प्रयोग करत बागकाम करावं लागतं.

माती बदलली की रोप बदलतं. कोणत्या मातीत कोणतं रोप घ्यावं? मातीचा पोत जसा असेल त्याप्रमाणे त्या मातीत कोणतं रोप चांगले उगवू शकेल हे ठरते. उदा: खडकाळ, आर्दता कमी असलेल्या मातीत निवडूंग, कोरफड चांगली उगवते. तर ओलावा अधिक असणाऱ्या मातीत गुलाब, जास्वंद अशी फुलझाडे चांगला तग धरतात.काहीवेळा प्रत्येक झाडासाठी वेगळे प्रयत्न करणं, वेगळे तंत्र वापरणं शक्य नसतं. त्यामुळे सरधोपट मार्ग निवडावा लागतो.

कुंडी भरताना काय घ्यावी काळजी?

  • रोपानुसार कुंडीचा आकार निवडावा. हँगींग कुंडी काहीशी लहान असते तर इतर रोपांसाठी १२ ते १४ इंच उंचीची कुंडी साधारणपणे वापरता येते.
     
  • कुंडीच्या तळाशी असलेले छिद्र मोकळे करून त्यावर खापराचे तुकडे किंवा नारळाच्या करवंट्यांचे तुकडे ठेवावेत. ही व्यवस्था जास्तीचे पाणी वाहून जावे परंतु खत, माती वाहून जाऊ नये व हवा खेळती राहावी यासाठी उपयोगी ठरते.
     
  • यावर नारळाच्या शेंड्या, झाडांचा पालापाचोळा दाबून भरावा. कुंडीची साधारण अर्धी उंची भरली की त्यावर खालीलप्रमाणे खत-मातीचे मिश्रण घालावे.
     
  • साधारणत: ३० टक्के माती आणि शेणखत, कंपोस्ट, कडुनिंबाची पेंड व ओंजळभर कोकोपीट, दोन चमचे स्टेरामिल, मूठभर राख व वाळू असे मिश्रण तयार करून कुंडी भरावी.

  • पाण्याचा निचरा व्हावा, योग्य ओलावा टिकून राहावा, रोपांना आवश्यक असलेली अन्नद्रव्ये मिळावीत यासाठी हे करणे गरजेचे आहे. हे प्रमाण कमी जास्त झाले तरी चालते. एखादा जिन्नस नसेल तरी चालतो.

  • कुंडीचा वरून दोन ते तीन इंच भाग मोकळा ठेवावा, म्हणजे पाणी घालताना माती बाहेर येणार नाही.

  • यातील प्रत्येक पदार्थाचे वेगळे महत्त्व आहे. शेणखत हिरव्या वाढीसाठी, कोकोपीट ओलाव्यासाठी आणि कंपोस्ट, स्टेरामील विविध पोषक घटकांचा पुरवठा करण्यासाठी महत्त्वाचे असते. कडुनिंबाची पेंड खत आणि कीटकनाशक असे दुहेरी काम करत असल्यामुळे तिचा वापर महत्त्वाचा आहे.

हँगीग कुंड्या भरण्यासाठी या टिप्स...

  • हँगिंग बास्केट वेगवेगळ्या प्रकारच्या मिळतात. जाळीच्या बास्केट असल्यास तळाला शेडनेट अगर तरटाचा तुकडा घालावा म्हणजे खत-माती वाहून जाणार नाही.
     
  • या कुंड्या आपण अडकवणार असल्याने याचे वजन हलके असणे गरजेचे आहे. या कुंड्या काठोकाठ भरू नयेत.
     
  • कुंड्यांमध्ये अत्यल्प माती आणि पालापाचोळा, कोकोपीट, खते यांचे प्रमाण अधिक असे मिश्रण घ्यावे. हँगिंग बास्केट काठोकाठ भरू नयेत.
     

Web Title: Use these simple tips to fill pots with soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.