Lokmat Agro >शेतशिवार > सर्व शेतकरी बांधवांच्या मोबाईल मध्ये असावेत असे शेती पिकांसाठी फायद्याचे मोबाईल ॲप्स

सर्व शेतकरी बांधवांच्या मोबाईल मध्ये असावेत असे शेती पिकांसाठी फायद्याचे मोबाईल ॲप्स

Useful mobile apps for agricultural crops that all farmers should have in their mobiles | सर्व शेतकरी बांधवांच्या मोबाईल मध्ये असावेत असे शेती पिकांसाठी फायद्याचे मोबाईल ॲप्स

सर्व शेतकरी बांधवांच्या मोबाईल मध्ये असावेत असे शेती पिकांसाठी फायद्याचे मोबाईल ॲप्स

कृषी विषयक माहितीसाठी उपयुक्त मोबाईल अॅप्स

कृषी विषयक माहितीसाठी उपयुक्त मोबाईल अॅप्स

शेअर :

Join us
Join usNext

आलिकडे ग्रामीण भागामध्येही मोबाईल विशेषतः स्मार्ट फोन चा वापर वाढला आहे. सुरुवातीच्या तुलनेमध्ये स्वस्तात इंटरनेटही उपलब्ध होत आहे त्यामुळे प्रत्येकाच्या हातामध्ये असलेल्या उपकरणाव्दारे कृषी विस्ताराचा वेग प्रचंड वाढू शकतो. कृषी विस्ताराच्या कार्यक्रमामध्ये आजवर दुरदर्शन, रेडिओ, वर्तमानपत्रे, माहितीपत्रके, घडीपत्रिका, पुस्तके, कृषी विषयक मासिके अशा विविध पर्यायांचा वापर केला जात आहे.

मात्र शेतकऱ्यांच्या गरजेनूसार त्यांच्या हाताच्या बोटांवर कृषिविषयक माहितीची उपलब्धता हि मोबाईलच्या माध्यमातून करणे शक्य आहे त्यासाठी मोबाईल मधील विविध कृषिविषयक ॲप्सची माहिती या लेखातून समजावून घेऊ.

कृषी विषयक उपयुक्त मोबाईल ॲप्स

१) किड व्यवस्थापन ॲप (IPM VNMKV PARBHANI) : विविध पिकांवर येणाऱ्या अनेक प्रकारच्या किडी येतात त्यामुळे मोठे नुकसानही होते त्यांच्या नियंत्रणासाठी केवळ रासायनिक किटक नाशकांचा वापर करण्यापेक्षा एकात्मीक किड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे असते.

तसेच या ॲपमध्ये ज्वारी, कापूस, ऊस, मका, बाजरी, गहू, तूर, मुग, उडिद, हरबरा, सोयाबीन, करडई, मोहरी, जवस, इत्यादी पिकांवरील एकात्मीक किड व्यवस्थपनाची माहिती दिली आहे त्यात नमुद किटक नाशके, त्यांच्या मात्रा यांची शिफारस कृषी विद्यापिठे, केंद्रीय किटक नाशक मंडळ फरिदाबाद आणि प्रकाशित संशोधन प्रकाशने यावर आधारलेले आहे.

२) एकात्मीक तण व्यवस्थापन ॲप : राष्ट्रीय कृषी विकास योजना तंत्रज्ञान प्रसार प्रकल्प, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि परभनी यांच्याव्दारे हे ॲप विकसीत केले आहे. या ॲपमध्ये तणामुळे होणारे नुकसान, तण नियंत्रणाचे उपाय, तणनाशके व त्यांचे प्रकार, तणनाशकाची मात्रा काढणे, पिक निहाय तणनाशकाचा वापर, विविध पिकांतील तण नियंत्रण शिफारशी, सध्या बाजारात उपलब्ध व उपयोगातील तणनाशकांची यादी इत्यादी संदर्भात माहिती दिली आहे.

३) पशू पोषण ॲप (Pashu Poshan) : आनंद (गुजरात) येथील राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (NDDB) यांनी विकसीत केलेल्या या ॲपव्दारे जनावरांचे संतुलित पोषण याबददल माहिती मिळते त्यात गाय किंवा म्हैस यांचे वय, दुग्धोत्पादन, दुधातील फॅट आणि आहार व्यवस्थापन इत्यादी माहिती भरल्यास किमान खर्चामध्ये संतूलित खाद्य व्यवस्थान करण्या संदर्भात माहिती उपलब्ध होते.

४) पीक पोषण ॲप : या ॲपमध्ये विविध पिकांसाठी आवश्यक असणारी प्रमुख अन्नद्रव्य आणि सुक्ष्म अन्नद्रव्य त्यांचे कार्य, कमतरतेची लक्षणे आणि उपाय यांची माहिती पिकांच्या छायाचित्रांसह दिली आहे. विविध प्रकारच्या जमीनीत असणारी अन्नद्रव्याची कमतरता, अन्नद्रव्य कमतरतेस कारणीभूत ठरणारे जमीनीचे गुणधर्म, पिकातील अन्नद्रव्य कमतरतादर्शक लक्षणे यांची माहिती उपलब्ध आहे.

५) पुसा कृषी ॲप (Pusa Krishi) : भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसीत केलेल्या तंत्रज्ञानाची माहिती देण्याच्या उद्देशाने केंद्रीय कृषी मंत्र्यांनी २०१६ मध्ये हे ॲप प्रक्षेपित केले त्यात भारतीय कृषी संशोधन परिषदेने विकसीत केलेल्या पिकांचे नविन वाण, संबंधीत माहिती, संसाधन संवर्धन पद्धती आणि कृषी यंत्रे यांची माहिती उपलब्ध केली आहे.

६) कापूस ॲप : परभणी कृषी विद्यापिठातील कृषी किटक शास्त्र विभाग आणि केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांच्या सहभागातून कापूस लागवड तंत्रज्ञानाची शास्त्रीय माहिती उपलब्ध करण्यासाठी 'कापूस ॲप' विकसीत केले आहे त्यात कापूस लागवडीची पूर्व तयारी, वाणांची निवड, बीजप्रक्रीया, अन्नद्रव्य व्यवस्थापन, तणनियंत्रण व आंतरमशागत, पाणी व्यवस्थापन, कापूस वेचनी व साठवणूक यांची माहिती दिली आहे.

७) अॅग्री मार्केट ॲप : मोबाईलपासून ५० कि.मी. अंतरातील सर्व बाजारपेठेमध्ये शेती मालाच्या किमती, बाजारभाव नेमका किती आहे याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी केंद्र सरकारने ॲप विकसीत केले आहे यात जिपीएस यंत्रणा वापरली जाते हे ॲप हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये उपलब्ध आहे.

८) किसान सुविधा ॲप : हे २०१६ मध्ये कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारव्दारे शेतकऱ्यांचे सक्षमीकरण आणि गावांच्या विकासासाठी हे मोबाईल ॲप विकसीत केले आहे.

९) किसान सारथी पोर्टल ॲप : भारत सरकारने शेतकऱ्यांनी त्यांच्या स्थानिक भाषेमध्ये शेती विषयक माहिती योग्यवेळी पोहचवण्यासाठी किसान सारथी पोर्टल सुरू केले आहे त्या त्या जिल्हयातील कृषी विज्ञान केंद्र या पोर्टलव्दारे कृषी विषयक सल्ला देण्याचे काम करते. या पोर्टलचा टोल फ्री क्रमांकावर (१८००१२३२१७५/१४४२६) एकदा नोंदणी केल्यास कृषी तज्ञांकडून सल्ला मिळतो.

१०) दामिनी ॲप : भारत सरकारच्या पृथ्वी व विज्ञान मंत्रालयाने विकसीत केलेले दामिनी हे मोबाईल ॲप पावसाळयात विजा कोसळून जिवीत हानीच्या घटना टाळण्यासाठी उपयुक्त ठरते. वादळी पाऊस, विजांचा कडकडात आणि विज कोसळण्याचा अंदाज व पुर्वसुचना मिळते.

यातील बहुतांश ॲप हे शासनाचे, कृषी विद्यापिठांनी विकसीत केलेले असल्यामुळे मोफत आहे. उदा. अॅन्ड्रॉइड मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअर वर तसेच यामध्ये स्थानीक, प्रादेशिक भाषेमध्ये माहिती दिलेली आहे.

लेखक 
प्रा. संजय बाबासाहेब बडे
सहाय्यक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग
दादासाहेब पाटील कृषी महाविद्यालय दहेगाव ता. वैजापूर जि. छत्रपती संभाजीनगर पिन कोड ४२३७०३ मो.नं. ७८८८२९७८५९.

हेही वाचा - Dairy Success Story १५ म्हशींच्या संगोपनातून राहुल पाटील मिळवितात महिन्याला दीड लाखाचे उत्पन्न

Web Title: Useful mobile apps for agricultural crops that all farmers should have in their mobiles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.