Join us

रसायनयुक्त मळीचे पाणी शेतीसाठी वापरताय? मग हे वाचाच

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 11:52 AM

औद्योगिक वसाहतीमधील निघणारे मळीचे पाणी शेतीला फायदेशीर असल्याचे सांगत असल्याने शेतकरी याला बळी पडून रसायनमिश्रित पाणी टँकरद्वारे शेतात टाकताना दिसून येतात.

गणेश पोळटेंभुर्णी : औद्योगिक वसाहतीमधील निघणारे मळीचे पाणी शेतीला फायदेशीर असल्याचे सांगत असल्याने शेतकरी याला बळी पडून रसायनमिश्रित पाणी टँकरद्वारे शेतात टाकताना दिसून येतात. ते कुठल्या शेतात टाकावे, कुठल्या शेतात टाकू नये, यासाठी जमिनीचे माती परीक्षण झालेले नसते. या अज्ञानामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

मुळात रसायनमिश्रित पाणी कंपनीबाहेर घेऊन जाण्याची किंवा सोडून देण्याची परवानगी पर्यावरण खाते देत नाही. मात्र, सर्रास नियम मोडून मळीचे रसायनमिश्रित पाणी कुठेही सोडून देण्यात येत आहे. याला आळा घालण्याची मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत.

हे पाणी नष्ट करणे किंवा त्यापासून पोटॅश निर्मिती करणे एवढे दोनच खर्चिक पर्याय साखर कारखाने व डिस्टलरी उत्पादित कंपनीकडे असतात. एमआयडीसीमधून निघणारे सांडपाणी ट्रिटमेंट करण्यासाठी कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये ईटीपी प्लांटची उभारणी करण्यात आलेली नाही.

राज्यातील इतर बऱ्याच औद्योगिक वसाहतींमध्ये सीईटीपी प्लांटची उभारणी केलेली असल्याचे तज्ज्ञ सांगत असून, टेंभुर्णी औद्योगिक वसाहतीमध्ये याची उभारणी केलेली दिसत नाही. हे सांडपाणी आजूबाजूचे जलस्रोत व पाळीव प्राणी यांना नुकसानकारक ठरत आहे.

औद्योगिक वसाहतीमधील दूषित रासायनिक पाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्लांट प्रत्येक कंपनीत आहे. मग हे रासायनिक मळीमिश्रित पाणी कारखान्यातून बाहेर येतेच कसे? हा संशोधनाचा विषय झाला असल्याचे पर्यावरण अधिकारी मोरे सांगतात.

रसायनमिश्रित पाण्यात सीओडी व बीओडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. जमिनीत हे पाणी सोडल्यास जमीन नापीक होऊ शकते किंवा बोअर तसेच विहीरमध्ये मिसळल्यास पाणी पिण्यायोग्य राहात नाही. मुरमाड किंवा क्षारयुक्त जमिनीचा पीएच ७ असल्यास मळीचे एकदाच पाणी सोडल्यास उपयुक्त ठरू शकते. मात्र काळ्या कसदार जमिनीत वारंवार सोडल्यास अशा जमिनी नापीक होऊ शकतात.

जमीन नापीक होतेरसायनमिश्रित पाण्यात सीओडी व बीओडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. जमिनीत हे पाणी सोडल्यास जमीन नापीक होऊ शकते किंवा बोअर तसेच विहीरमध्ये मिसळल्यास पाणी पिण्यायोग्य राहात नाही. मुरमाड किंवा क्षारयुक्त जमिनीचा पीएच ७ असल्यास मळीचे एकदाच पाणी सोडल्यास उपयुक्त ठरू शकते. मात्र काळ्या कसदार जमिनीत वारंवार सोडल्यास अशा जमिनी नापीक होऊ शकतात.

मळीमिश्रित रासायनिक पाण्यात हे घटक असतातक्लोराइड, सल्फेट, कॅल्शिअम, पोटॅशियम, फॉस्फेट ही घातक रसायने या पाण्यात असतात. यामुळे कॅन्सरसारख्या रोगांना किंवा जनावरे व गर्भधारणेला धोका निर्माण होऊ शकतो.

टॅग्स :शेतकरीशेतीसाखर कारखानेसोलापूरपीकखते