Join us

Ustod Kamgar : ऊसतोड कामगारांनो बिबट्या पासून बचावासाठी अशी घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2024 12:49 PM

राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबरनंतर सुरु होणार असल्याने ऊसतोड मजूर दाखल होऊ लागले आहेत. मजुरांची वाहने रस्त्यावर दिसू लागली आहेत.

राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबरनंतर सुरु होणार असल्याने ऊसतोड मजूर दाखल होऊ लागले आहेत. मजुरांची वाहने रस्त्यावर दिसू लागली आहेत. 

ऊसतोडीचा हंगाम सुरू होत असल्याने ऊसतोड करत असताना शेतकरी व मजुरांनी बिबट्यापासून बचावासाठी आवश्यक काळजी घेणे गरेजेचे आहे.

कशी घ्याल काळजी१) ऊसतोड सुरू असताना मजुरांनी व शेतकऱ्यांनी आपल्या लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे.२) अनेकदा त्यांना ऊसतोड सुरू असलेल्या भागातच खेळायला मोकळे सोडले जाते.३) मुलांना ठेवलेल्या ठिकाणी हातात घुंगराची काठी घेऊन मोठ्या व्यक्तीस थांबवावे, जेणेकरून बिबट्या दिसल्यास मुलांची सुरक्षा करता येते.४) खूप वाकून ऊसतोड करू नये. अशा वेळी दुसराच एखादा प्राणी आहे असे समजून बिबट्याचा पाठमोरा हल्ला होऊ शकतो.५) ऊसतोड सुरू असताना ट्रॅक्टरमधील टेपरेकॉर्डरवर किंवा चांगल्या वायरलेस ब्लूटूथ स्पीकरचा वापर करून मोठ्या आवाजात गाणी सुरू ठेवावीत, यामुळे बिबट्या जवळ येण्याची शक्यता कमी होते.६) ऊसतोड किंवा शेतीची कामे करत असताना समूहाने कामे करावीत.७) एकट्या व्यक्तीने ऊसतोड किंवा शेतीची कामे करू नयेत.८) गावाजवळ, जंगलात, शेतात अथवा गावठाण हद्दीत बिबट्या दिसल्यास बघण्यास गर्दी करू नये.९) त्यांना दगड मारून पळवण्याचा प्रयत्न अथवा मोबाइलवर फोटो काढण्याचा प्रयत्न करू नये.१०) बिबट्या तसेच बिबट्याची पिल्ले आढळल्यास तत्काळ संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

टॅग्स :ऊससाखर कारखानेकामगारशेतकरीबिबट्यावनविभाग