Lokmat Agro >शेतशिवार > Ustod Kamgar : हजारो ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्राच्या वाटेवर

Ustod Kamgar : हजारो ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्राच्या वाटेवर

Ustod Kamgar : Thousands of sugarcane workers on their way to western Maharashtra | Ustod Kamgar : हजारो ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्राच्या वाटेवर

Ustod Kamgar : हजारो ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्राच्या वाटेवर

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबरनंतर सुरु होणार असल्याने ऊसतोड मजूर दाखल होऊ लागले आहेत.

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबरनंतर सुरु होणार असल्याने ऊसतोड मजूर दाखल होऊ लागले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

संतोष भिसे
सांगली : सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १५ नोव्हेंबरनंतर सुरु होणार असल्याने ऊसतोड मजूर दाखल होऊ लागले आहेत.

हजारो मजुरांची वाहने, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या रस्त्यावर दिसू लागली आहेत.  कारखाना परिसरात त्यांच्या झोपड्या उभ्या राहू लागल्या आहेत. यामुळे साखर कारखानदार निवांत झाले असले, तरी राजकीय पक्षांची डोकेदुखी मात्र वाढली आहे.

विदर्भ, मराठवाड्यातील मतदानाकडे पाठ फिरवून मजुरांचे तांडे पश्चिम महाराष्ट्रात येऊ लागले आहेत. स्थलांतरामुळे मजुरांचे मतदान होऊ शकणार नाही, याचा फटका तेथील उमेदवारांना बसणार आहे.

पश्चिम महाराष्ट्रात सुमारे ७० हजारहून अधिक ऊसतोड मजूर विदर्भ मराठवाडा आणि विजापूर जिल्ह्यांतून येतात. प्रामुख्याने बीड, परभणी, जालना, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतून मजूर येतात. दिवाळी संपताच त्यांचा प्रवास कारखान्यांकडे सुरू होतो. 

मार्चमध्ये हंगाम संपताच परततात. सध्या महाराष्ट्रभरात निवडणुका सुरू असल्याने या स्थलांतरित मजुरांच्या मतदानाची चिंता राजकीय पक्ष आणि उमेदवारांना आहे. त्यांचे मतदान बुडणार असल्याने फटका बसणार आहे.

निकालावरही परिणाम होणार आहे. मतदार जिल्ह्याबाहेर निघून गेल्याने एकूण मतदानाची टक्केवारी घसरणार आहे. प्रशासनालाही या घटत्या टक्केवारीची चिंता आहे.
जिल्ह्यात स्थलांतरित होऊन येणाऱ्या या मजुरांच्या मतदानाविषयी सांगली जिल्हा प्रशासन मात्र हतबल आहे.

यंदा पाऊस चांगला, थोडं थांबा
मराठवाड्यातील ऊसतोड मजुरांच्या पश्चिम महाराष्ट्रात स्थलांतराविषयी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही चिंता व्यक्त केली आहे. १२ ऑक्टोबररोजी भगवानगडावरील दसरा मेळाव्यात याची जाहीर वाच्यता केली. मजुरांना आवाहन करताना म्हणाल्या, यंदा मराठवाड्यात, आपल्या जिल्ह्यात पाऊस चांगला झाला आहे, त्यामुळे मजुरांनी मतदारसंघातच थांबावे. शेतीत लक्ष घालावे. निवडणूक पार पाडावी. मतदान सोडून साखर कारखान्यांकडे पळू नये. मुंडे यांच्या आवाहनानंतरही हजारो मजूर सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत येतच असल्याचे दिसत आहे.

Web Title: Ustod Kamgar : Thousands of sugarcane workers on their way to western Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.