Lokmat Agro >शेतशिवार > रेशमावर उझी माशीचा प्रादुर्भाव, तुती खाणाऱ्या या किडीचा करा बंदोबस्त

रेशमावर उझी माशीचा प्रादुर्भाव, तुती खाणाऱ्या या किडीचा करा बंदोबस्त

Uzi fly infestation on silk, get rid of this pest that eats mulberry | रेशमावर उझी माशीचा प्रादुर्भाव, तुती खाणाऱ्या या किडीचा करा बंदोबस्त

रेशमावर उझी माशीचा प्रादुर्भाव, तुती खाणाऱ्या या किडीचा करा बंदोबस्त

मराठवाड्यात या माशीने केले २० ते ३० टक्के नुकसान

मराठवाड्यात या माशीने केले २० ते ३० टक्के नुकसान

शेअर :

Join us
Join usNext

प. बंगाल राज्यातून स्‍थलांतरीत झालेली व कर्नाटक, आंध्र प्रदेशात हाहाकार माजवत असलेली व रेशीम कीटकावर प्रादूर्भाव करणार किड उझी माशी सन 2018 पासून महाराष्ट्रातील जालना, बीड, लातूर व परभणी जिल्हयात रेशीम कोष पिकाचे 20 ते 30 टक्के नुकसान करत असल्याचे अढळून आले आहे.

भारतात 80 टक्के कच्चे रेशीम कीटक संगोपनगृह असून महाराष्ट्र राज्यात 98 टक्के कच्चे शेडनेट गृहच रेशीम कीटक संगोपनासाठी शिफारस करण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांनी हळूहळू 1 ते 1.5 एकर तुती बागेसाठी पक्के संगोपनगृह बांधुन घ्यावीत म्हणजे रेशीम कोष उत्पादनात सातत्य आणि शाश्वतता टिकून राहील. उझी माशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पाने साठवण गृह (अंधार खोली) ॲन्ट रूम असावी. सरळ तुती फांद्या संगोपनगृहात नेवून खाद्य न देता अंधार खोलीत 2 तास ठेवून नंतर खाद्य द्यावे.

उझी माशी एक किंवा दोन पांढऱ्या दुधाळ रंगाची, टाचणीच्या डोक्याच्या आकाराची अंडी चौथ्या किंवा पाचव्या वाढीच्या अवस्थेतील अळीच्या त्वचेवर अंडी घालते. त्यामुळे रेशीम किड्यांवर काळा डाग पडतो. बदलता पाऊस, तापमान आणि आर्द्रतेनुसार उझी माशीची अंडी देण्याची क्षमता बदलते.

Web Title: Uzi fly infestation on silk, get rid of this pest that eats mulberry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.