दीपोत्सव अर्थात दिवाळीला खऱ्या खऱ्या अर्थाने गुरुवारी (दि.९) वसुबारसने सुरुवात होत असून, भारतीय संस्कृतीत गाईला विशेष महत्त्व दिले आहे. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसूबारस. दिवाळीला सणांचा राजा म्हटले जाते. वसुबारसपासून अर्थाने दीपोत्सवाला सुरुवात होते.
या दिवशी गायी वासराचे मनोभावे पूजन केले जाते. नाशिक शहरात असंख्य गोशाळा असून या ठिकाणी दरवर्षी मोठा सोहळा आयोजित केला जातो. शहरात असणाऱ्या सात गोशाळांमध्ये जवळपास २००० हून अधिक गाय-वासरांचे पूजन करण्यात येणार आहे. मोठ्या उत्साहात वसुबारस साजरी करण्यात येणार आहे. गो-शाळेमध्ये कीर्तन, भजन, गो- पूजनासह महाप्रसाद याचे आयोजन यंदा करण्यात आले आहे. गाई- वासरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असून वसू म्हणजे द्रव्य, अर्थ, धन त्यासाठी असलेली बारस होय. शहरातील गोशाळांमध्ये आज सायंकाळी वसुबारसचे पूजन होत असून सहभागी होण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. शहरातील मंगलरूप गोशाळा, कृषी गोसेवा ट्रस्ट, नंदिनी गोशाळा, बालाजी गोशाळा, श्री नाशिक पंचवटी पांजरापोल, श्रीकृष्ण गोशाळा आहेत.
गोवंशांना गोड पदार्थांचा नैवेद्य
गोशाळा व उडिदाचे वडे, भात व गोड पदार्थ करून गाईला खाऊ घालतात. घरात लक्ष्मी देवीचे आगमन व्हावे, या हेतूने वासरू असलेल्या गाईची पूजा करण्याची पद्धत आहे. ज्यांच्या घरी गुरे-वासरे आहेत त्यांच्या घरी पुरणाचा स्वयंपाक केला जातो.
वसूबारसला का करतात गाय- वासराची पूजा?
अश्विन महिन्यातील वद्य द्वादशीला गोधन पूजनेने दीपावली सुरुवात होते. घरासमोर रांगोळ्या काढून, महिला मंडळ उपवास करून सर्व मनोकामना, मुलाबाळांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून प्रत्यक्ष गाईची पूजा केली जाते. अनादिकालापासून गोपालन हे आपल्या देशात केले जाते. भौगोलिक परिस्थिती आणि नैसर्गिक साधनसामग्रीचा उपलब्धतेवर देशाच्या विविध भागात गोवंशाची निर्मिती होत गेली. पूर्वीच्या काळी गोधनाच्या संख्येवर कुटुंबाची श्रीमंती मोजली जात होती. देशातील गोवंशासह दुध उत्पदनाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी बसूबारस या दिवशी गायीसह वासराचीही पूजा केली जाते. यामध्ये केवळ गायीचे नाही तर वासराचेही पूजन करण्याला अनन्यासाधारण महत्व आहे.
vasubaras वसुबारस; गोधन पुजा आणि गोविज्ञान
पांझरापोळ गोशाळा
मंगल रूप गोशाळा,पांडवलेणी |
- एकूण गोवंश ११६ आहेत
- गेल्या बारा वर्षांपासून आजारी आणि अपघातग्रस्त गोवंशांसाठी गोशाळा चालवली जाते.
- टीबी, ट्युमर, कॅन्सर, असलेल्या अपघातग्रस्त गार्ड यांच्यावर शाळेत उपचार आणि संगोपन होते.
- गोहत्या करण्यापासून १६ गाईना वाचविण्यात गोशाळेला यश आले.
सुविधा: २ हायड्रोलिक अॅम्ब्युलन्स, सुसज्ज जागा, ७ कर्मचारी नियुक्त
कार्यक्रमाचे स्वरूप
- सायंकाळी चार ते सात सामूहिक पूजन होणार आहे. नवशा गणपती महिला मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम.
श्री नाशिक पंचवटी पांझरापोळ गोशाळा
- एकूण गोवंश १५०० आहेत
- गेल्या १४५ वर्षापासून गोशाळा चालवली जाते.
- गोहत्या करण्यापासून वाचविलेल्या गाईंना गोशाळेत सांभाळले जाते. संगोपन होते.
- सुविधा २ डॉक्टर, सुसज्ज जागा, १० सहकारी वैद्यकीय कर्मचारी निवृत
कार्यक्रमाचे स्वरूप:
दुपारी तीन ते सायंकाळी सात गोभक्तांच्या उपस्थितीत सामूहिक पूजन होणार आहे.
गोशाळा, कृषी सेवा केंद्र
- एकूण गोवंश २०० आहेत
- गेल्या ३५ वर्षापासून आजारी आणि अपघातग्रस्त गोवंशांसाठी गोशाळा चालवली जाते.
- टीबी, ट्युमर, कॅन्सर असलेल्या अपघातग्रस्त गाई यांच्यावर शाळेत उपचार होतात आणि संगोपन होते.
सुविधा: १ डॉक्टर, सुसज्ज जागा. २ कुटुंबे नियुक्त केली आहेत.
कार्यक्रमाचे स्वरूप : सायंकाळी पाच ते सहा गोभक्तांच्या उपस्थितीत पूजन होणार आहे. श्रीराम मंदिर भजनी मंडळातर्फे भजन.
नंदिनी गोशाळा, उमराळे, पेठ रोड
- एकूण गोवंश २०० आहेत
- गेल्या १९ वर्षांपासून जीवदया गार्डचे संगोपन केले जाते..
- गाई यांच्यावर शाळेत उपचार केले जातात आणि संगोपन होते.
सुविधा : १ डॉक्टर, सुसज्ज जागा, औषध व्यवस्था उपलब्ध
कार्यक्रमाचे स्वरूप :
सायंकाळी साडेचार गोभक्तांच्या उपस्थितीत सामूहिक पूजन होणार आहे.