Join us

Vermicompost गांडूळखत निर्मिती जोडव्यवसायातून किमान ३० हजार रुपयांचा नफा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 3:11 PM

नरवाड (ता. मिरज) येथील प्रदीप रघुनाथ खोचगे (पाटील) यांनी शेतात पाला-पाचोळ्यापासून उत्कृष्ट गांडूळ खतनिर्मिती करून एका महिन्यात किमान २५ ते ३० हजार रुपये कमवून शेतीशी निगडित जोड व्यवसाय केला आहे.

दिलीप कुंभारनरवाड : नरवाड (ता. मिरज) येथील प्रदीप रघुनाथ खोचगे (पाटील) यांनी शेतात पाला-पाचोळ्यापासून उत्कृष्ट गांडूळ खतनिर्मिती करून एका महिन्यात किमान २५ ते ३० हजार रुपये कमवून शेतीशी निगडित जोड व्यवसाय केला आहे. यासाठी खोचगे यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

दिवसेंदिवस शेतीत रासायनिक खतांचा होणारा वारेमाप वापरामुळे शेती नापीक होत चालली आहे. यावर सेंद्रिय शेती अंतर्गत खोचगे यांनी गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प तयार केला आहे. यासाठी पाला, पाचोळा, देशी गाईचे शेण व पाणी याचा वापर करून गांडूळ खतनिर्मिती केली आहे.

पाला पाचोळ्याचे पाच ते सहा थर तयार करून प्रत्येक थरावर देशी गायीच्या शेणाचे पाणी मिश्रित काला ओतून गांडूळखत निर्मिती केली जाते. आहे. पहिल्या थरातून आऊटलेटमधून अर्क बाहेर काढला आहे. हा अर्क किमान चार दिवसांपासून बाहेर पडतो. अर्काला बाजारात पिकांवर फवारणीसाठी चांगली मागणी आहे.

गांडूळ खताचे तीन बेड तयार केले आहेत. यातून किमान एक टन गांडूळ खताची निर्मिती केली जात आहे. सदर खत पॉलिथीन पिशवीत घालून एक किलोचे पॅकिंग केले आहे. याला वाढती मागणी आहे.

व्यवसायात खोचगे यांना त्यांच्या पत्नी माधुरी, मुलगा महेंद्र व सून पूजा मदत करतात. यामुळे बाहेरच्या मजुराशिवाय सारे कुटुंबच यासाठी वाहून घेतले आहे. २०१९ मध्ये प्रदीप खोचगे यांना कोल्हापूरच्या भीमा कृषी प्रदर्शनात सेंद्रिय शेती भूषण पुरस्कार प्राप्त झाला.

अधिक वाचा: Kharif Pikvima यंदाच्या खरीपसाठीही मिळणार एक रुपयात पिक विमा

टॅग्स :शेतकरीशेतीपीकसेंद्रिय खतखतेसेंद्रिय शेती