Lokmat Agro >शेतशिवार > राज्यात २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबरला मतदान

राज्यात २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबरला मतदान

Voting for 2 thousand 359 gram panchayats in the state on November 5 | राज्यात २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबरला मतदान

राज्यात २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबरला मतदान

राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्य पदाच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे.

राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्य पदाच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्य पदाच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

श्री. मदान यांनी सांगितले की, संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा कलावधी - १६ ते २० ऑक्टोबर २०२३
नामनिर्देशनपत्रांची छाननी - २३ ऑक्टोबर २०२३
नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा कालावधी - २५ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत
निवडणूक चिन्हांचे वाटप - २५ ऑक्टोबर २०२३ 
मतदान - ५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत
मतमोजणी - ६ नोव्हेंबर २०२३ 
गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे ७ नोव्हेंबर २०२३ रोजी मतमोजणी होईल.

कोणत्या जिल्ह्यात निवडणूक होणार?
ठाणे ६१
रायगड २१०
रत्नागिरी १४
पालघर ५१
धुळे ३१
सिंधुदुर्ग २४
नाशिक ४८
जळगाव १६८
अहमदनगर १९४
नंदुरबार १६
पुणे २३१
सोलापूर १०९
सातारा १३३
कोल्हापूर ८९
सांगली ९४
छत्रपती संभाजीनगर १६
बीड १८६
नांदेड २५
धाराशिव ६

Web Title: Voting for 2 thousand 359 gram panchayats in the state on November 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.