Join us

राज्यात २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबरला मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2023 8:37 AM

राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्य पदाच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे.

राज्यभरातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्य पदाच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली.

श्री. मदान यांनी सांगितले की, संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याचा कलावधी - १६ ते २० ऑक्टोबर २०२३नामनिर्देशनपत्रांची छाननी - २३ ऑक्टोबर २०२३नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा कालावधी - २५ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंतनिवडणूक चिन्हांचे वाटप - २५ ऑक्टोबर २०२३ मतदान - ५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंतमतमोजणी - ६ नोव्हेंबर २०२३ गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे ७ नोव्हेंबर २०२३ रोजी मतमोजणी होईल.

कोणत्या जिल्ह्यात निवडणूक होणार?ठाणे ६१रायगड २१०रत्नागिरी १४पालघर ५१धुळे ३१सिंधुदुर्ग २४नाशिक ४८जळगाव १६८अहमदनगर १९४नंदुरबार १६पुणे २३१सोलापूर १०९सातारा १३३कोल्हापूर ८९सांगली ९४छत्रपती संभाजीनगर १६बीड १८६नांदेड २५धाराशिव ६

टॅग्स :ग्राम पंचायतनिवडणूकमहाराष्ट्रराज्य सरकार