Join us

शेणखतासाठी वेटिंग, मागणी वाढली ट्रॉलीभर शेणखताला कसा मिळतोय भाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 10:42 AM

पेरणीपूर्व जमिनीची नांगरणी करतानाच शेणखत शेतात मिसळले जाते; त्यामुळे उत्पादकताही वाढते. शेणखताला वाढती मागणी असल्याने त्याचे दरही वाढतेच आहेत.

शेणखताच्या नियमित वापरामुळे जमिनीच्या कणांच्या रचनेत बदल होऊन सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. पिकाच्या मुळांची चांगली वाढ होऊन, जमिनीतून अन्नद्रव्यांचे शोषण चांगल्या प्रकारे होते.

पेरणीपूर्व जमिनीची नांगरणी करतानाच शेणखत शेतात मिसळले जाते; त्यामुळे उत्पादकताही वाढते. शेणखताला वाढती मागणी असल्याने त्याचे दरही वाढतेच आहेत.

शेणखतासाठी वेटिंगशेणखतासाठी आधी सांगावे लागते. वर्ष, सहा महिने शेणकीत शेण साठवून कुजल्यानंतर त्याची विक्री केली जाते. त्यामुळे शेतकरी वेटिंगमध्ये असतात.

शेणखत कसे तयार कराल?गायी, म्हशींचे शेण, त्यांच्या पुढ्यातील उरलेली वैरण किवा गवत एका खड्यात साठवले जाते. सहा महिने, वर्षभर साठवल्याने कुजून चांगल्या प्रकारचे शेणखत तयार होते. पावसाळ्यापूर्वी खड्यातून शेणखत काढून त्याची विक्री करता येते.

भाव काय?अलीकडे अडीच ते तीन हजार रुपये एक ट्रॅक्टर इतकी शेणखताची किंमत सांगितली जाते. शेणखताच्या किमतीपेक्षा मजूर व वाहतुकीचा खर्च अधिक असतो

रासायनिक खतांचे दुष्परिणाम• रासायनिक खतांचा अंश उत्पादनात उतरत असून, अन्नाच्या स्वरूपात तो मानवी शरीरात जातो. आरोग्यावर त्याचा परिणाम होत असतो.• शेणखत पिकाच्या वाढीसह, उत्पादकतेसाठी चांगले असल्याने शेती, बागायतीसाठी वापर वाढला आहे.

शेणखतातून अन्नद्रव्यांचे मिळणारे प्रमाण रासायनिक खतांच्या तुलनेने अत्यल्प असते. मात्र, सेंद्रिय पदार्थांचा अंतर्भाव जास्त असल्यामुळे सूक्ष्मजिवांनी युक्त अनुकूल वातावरण जमिनीत तयार होते. त्यामुळे शेणखत वापरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. - रोहित पवार

शेणखताच्या उपयुक्ततेमुळे मागणी अधिक आहे. मात्र किमतीवेळी घासाघीस केली जाते. खत उपसण्यासाठी मजूर तसेच वाहतुकीचा खर्च सर्वाधिक होतो. - अनिल मोरे

अन्य खतांच्या तुलनेमध्ये शेणखताची किंमत अधिक आहे. मात्र फायदे अधिक आहेत. शेणखतापेक्षा मजुरी, वाहतूक खर्च अधिक असल्याने दर वाढतात. - संतोष शेट्ये

अधिक वाचा: Soil Testing खरीप आला आपल्या मातीचं आरोग्य तपासून घ्या

टॅग्स :सेंद्रिय खतशेतकरीशेतीपीकपेरणीखतेखरीप