Lokmat Agro >शेतशिवार > राज्यातील कारखाने सुरू होण्याची प्रतीक्षा, किती मिळेल उसाचा पहिला हप्ता

राज्यातील कारखाने सुरू होण्याची प्रतीक्षा, किती मिळेल उसाचा पहिला हप्ता

Waiting for sugarcane factories to start in the state How much will the first installment of sugarcane get? | राज्यातील कारखाने सुरू होण्याची प्रतीक्षा, किती मिळेल उसाचा पहिला हप्ता

राज्यातील कारखाने सुरू होण्याची प्रतीक्षा, किती मिळेल उसाचा पहिला हप्ता

विधानसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापत असले तरी साखर कारखाने कधी सुरू होणार आणि उसाचा अंतिम दर किती मिळणार की आंदोलन चिघळणार!, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

विधानसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापत असले तरी साखर कारखाने कधी सुरू होणार आणि उसाचा अंतिम दर किती मिळणार की आंदोलन चिघळणार!, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

विधानसभेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापत असले तरी साखर कारखाने कधी सुरू होणार आणि उसाचा अंतिम दर किती मिळणार की आंदोलन चिघळणार!, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

यंदा परतीच्या पावसामुळे आणि विधानसभा निवडणुकीमुळे गळीत हंगाम लांबला आहे. तसेच जनावरांच्या वैरणीच्या टंचाईने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. हंगाम लांबल्यामुळे पुरात गेलेल्या उसाची तोडणी कधी होणार आणि त्या शेतात फेर लागण कधी करायची? या विवंचनेत शेतकरी अडकला आहे.

यंदा कर्नाटक सरकार आणि महाराष्ट्र सरकारने हंगामासाठी १५ नोव्हेंबरचा मुहूर्त घोषित केल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे पांढरे झाले आहे. गत हंगाम लांबल्याने त्याचा परिणाम शेतकऱ्याला सोसावा लागत असल्याचे सर्वश्रुत आहे.

यंदाची स्थिती त्यापेक्षा वेगळी नाही. २० नोव्हेंबरला निवडणूक, निकाल, सत्ताकारण आणि ऊसदरावर तोडगा या भानगडीमुळे हंगामाला जोर कधी लागणार? हे अगतिक आहे.

यंदा ऊस परिषेदत संघटनेने पहिला हप्ता ३७०० आणि मागचे २०० रुपये दिल्यानंतर उसाला कोयता लावणार, असा इशारा कारखानदारांना देऊन आंदोलनाचे पूर्वसूचित केले आहे.

सर्वच कारखान्यांनी गव्हाणीत मोळी टाकण्यासाठी दीपावलीचा मुहूर्त साधला असला तरी निवडणुकीत उतरलेले साखरसम्राट कारखान्याचा दर घोषित करून शेतकऱ्यांना निवडणुकीची पर्वणी देणार की ऊसदर न घोषित करता गळीत हंगामाचा शुभारंभ करणार, याबाबत उत्सुकता आहे.

Web Title: Waiting for sugarcane factories to start in the state How much will the first installment of sugarcane get?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.