अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित, भाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषी विज्ञान केंद्र बारामती आयोजित तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यशाळा यात शेतकरी बांधवांना "फळे व भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन या विषयावर दि. ०५ ते ०७ ऑक्टोबर २०२३ दरम्यान प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
प्रशिक्षणात काय काय शिकवले जाणार आहे?
- भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन.
- फळपिके रोपवाटिका व्यवस्थापन.
- फळे आणि भाजीपाला मधील कलम पद्धती.
- रोपवाटिका माध्यमे व निर्जंतुकीकरण.
- रोपवाटीकेमधील खते व पाणी व्यवस्थापन.
- रोपवाटीकेमधील कीड व रोग व्यवस्थापन.
- प्रात्यक्षिक सत्र.
प्रशिक्षणाचा उद्देश
- अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून भाजीपाला व फळे रोपे तयार करण्याची माहिती करून देणे.
- रोपवाटिका व्यवस्थापनामध्ये नेदरलँड/डच तंत्रज्ञानाचा उपयोग .
- रोपवाटिका कलम तंत्रज्ञान.
- रोपवाटिका यशस्वी करण्याची माहिती.
हे प्रशिक्षण कोणासाठी
आधुनिक पद्धतीने रोपांची निर्मिती करणारे इच्छित शेतकरी, युवक वर्ग, शेतकरी बचत गट व कंपनी, कृषी पदविका व पदवीधारक व शेतीची आवड असणाऱ्यांसाठी.
वेळ: सकाळी १०.०० ते ०५.००
प्रशिक्षण शुल्क: ६००० रु
संपर्क
०२११२ - २५५५२७
९१४ ६७८९६९६
coekvkbaramati@gmail.com