Join us

फळे व भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन प्रशिक्षण हवं आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 1:29 PM

अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून भाजीपाला व फळे रोपे तयार करण्याची माहिती करून देणे या उद्देशाने आयोजित फळे व भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन प्रशिक्षण

अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित, भाजीपाला गुणवत्ता केंद्र, कृषी विज्ञान केंद्र बारामती आयोजित तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यशाळा यात शेतकरी बांधवांना "फळे व भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन या विषयावर दि. ०५ ते ०७ ऑक्टोबर २०२३ दरम्यान प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

प्रशिक्षणात काय काय शिकवले जाणार आहे?- भाजीपाला रोपवाटिका व्यवस्थापन.- फळपिके रोपवाटिका व्यवस्थापन.- फळे आणि भाजीपाला मधील कलम पद्धती.रोपवाटिका माध्यमे व निर्जंतुकीकरण.रोपवाटीकेमधील खते व पाणी व्यवस्थापन.रोपवाटीकेमधील कीड व रोग व्यवस्थापन.प्रात्यक्षिक सत्र.प्रशिक्षणाचा उद्देश - अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून भाजीपाला व फळे रोपे तयार करण्याची माहिती करून देणे.रोपवाटिका व्यवस्थापनामध्ये नेदरलँड/डच तंत्रज्ञानाचा उपयोग .रोपवाटिका कलम तंत्रज्ञान.रोपवाटिका यशस्वी करण्याची माहिती.

हे प्रशिक्षण कोणासाठी आधुनिक पद्धतीने रोपांची निर्मिती करणारे इच्छित शेतकरी, युवक वर्ग, शेतकरी बचत गट व कंपनी, कृषी पदविका व पदवीधारक व शेतीची आवड असणाऱ्यांसाठी.

वेळ: सकाळी १०.०० ते ०५.००प्रशिक्षण शुल्क: ६००० रु

संपर्क०२११२ - २५५५२७९१४ ६७८९६९६coekvkbaramati@gmail.com

टॅग्स :फळेभाज्याकृषी विज्ञान केंद्रबारामतीशेतकरीशेती