Lokmat Agro >शेतशिवार > ड्रोन पायलट व्हायचय; मराठवाडा कृषी विद्यापीठात सुरु होतोय अभ्यासक्रम

ड्रोन पायलट व्हायचय; मराठवाडा कृषी विद्यापीठात सुरु होतोय अभ्यासक्रम

Want to be a drone pilot; Course is starting in Marathwada Agricultural University | ड्रोन पायलट व्हायचय; मराठवाडा कृषी विद्यापीठात सुरु होतोय अभ्यासक्रम

ड्रोन पायलट व्हायचय; मराठवाडा कृषी विद्यापीठात सुरु होतोय अभ्यासक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील नाहेप केंद्राद्वारा सहा महिन्याचा कृषि ड्रोन तंत्रज्ञानावरील व्यावसायिक व संशोधन प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यापीठ वर्धापन दिन १८ मे पासून सुरु होत आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील नाहेप केंद्राद्वारा सहा महिन्याचा कृषि ड्रोन तंत्रज्ञानावरील व्यावसायिक व संशोधन प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यापीठ वर्धापन दिन १८ मे पासून सुरु होत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील नाहेप केंद्राद्वारा सहा महिन्याचा कृषि ड्रोन तंत्रज्ञानावरील व्यावसायिक व संशोधन प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यापीठ वर्धापन दिन १८ मे पासून सुरु होत असून या अभ्यासक्रमाकरिता सेरेब्रोस्पार्क इंनोवेशन्स पुणे व वनामकृवि परभणी यांच्या मध्ये करार झाला आहे.

या अभ्यासक्रमाकरिता रिमोट पायलट लायसन्स धारक अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर उमेदवार पात्र आहेत. या अभ्यासक्रमात ड्रोन तंत्रज्ञानावरील मूलभूत अभ्यासक्रम व कृषी उपयुक्तता ज्यामधे पिक निरिक्षण सेन्सर प्रणालीतून ड्रोन द्वारा विविध कार्य, पीक रोग तपासणी, फवारणी सारखी विविध कार्य करण्याकरिता संरचना व निर्मिती सारख्या शेतीविषयक नवीन ड्रोन तंत्रज्ञान शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

मा. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे स्वतः या अभ्यासक्रमात एक विषय शिकविणार असून अभ्यासक्रमातील कृषी विषयक ड्रोन तंत्रज्ञान अभ्यासक्रम तयार करताना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके आणि नियंत्रक प्रवीण निर्मळ यांची प्रमुख उपस्तिथी होती.

या अभ्यासक्रमाची माहिती htttp://nahep.vnmkv.org.in या संकेतस्थळावर ऊपलब्ध असून सदरील अभ्यासक्रमाकरिता इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज गूगल फॉर्म द्वारे संकेत स्थळावर नोंदीत करावा.

या अभ्यासक्रमानंतर विविध कृषी ड्रोन उत्पादक कंपनी, शासकीय कार्यालय, सुरक्षा मंत्रालय, ई. सारख्या क्षेत्रात नौकरी वा स्वत:चा व्यवसाय असा फायदा होऊ शकतो. मागील ४ वर्षापासुन नाहेप केंद्राने कृषी ड्रोन क्षेत्रात भरपूर कार्य केलेले आहे. 

संशोधन विद्यार्थ्यांना काटेकोर कृषी व्यवसायकता साधण्यासाठी संधी उपलब्ध करून दिल्या आहेत व विविध १२ देशात ५५ संशोधन विद्यार्थ्यांना तसेच २५ प्राध्यापकांना एक ते तीन महिने प्रशिक्षणासाठी पाठविले व त्यावर संशोधन प्रकाशने झाली.

सेरेब्रोस्पार्क इंनोवेशन्स, पुणे ड्रोन संरचना, उत्पादन व कृषि संबंधित सेवा कार्य करीत असून पाच वर्षाचा करार कालावधी दरम्यान कृषी ड्रोन संशोधन, चालक, चाचणी व दुरुस्ती सारख्या कार्याकरिता वनामकृवि सोबत कार्य करणार असून या करारातून दोन्ही संस्थांना निश्चित कार्य प्रणाली करण्यास आश्वासित केले.

नाहेप चे प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे यांनी प्रास्ताविक व संशोधन करण्यासंबंधी करारा बाबत माहिती दिली. याप्रसंगी उप अन्वेषण डॉ. डी. डी. टेकाळे, डॉ. गोदावरी पवार, डॉ. प्रवीण कापसे, डॉ. विशाल इंगळे, डी. व्ही. पाटील यांची उपस्थिती होती. या अभ्यासक्रम व करार कार्यात इंजी. श्रद्धा मुळे, संशोधन सहाय्यक व इंजी. विशाल काळबांडे यांनी सहभाग नोंदविला.

अधिक वाचा: ऐन उन्हाळ्यात ट्रॅक्टरलाही होऊ शकतो का उष्माघात? अशी घ्या काळजी

Web Title: Want to be a drone pilot; Course is starting in Marathwada Agricultural University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.