वाटेगाव : वाटेगाव (ता. वाळवा) येथील प्रगतशील शेतकरी रामचंद्र गणपती फोंडे यांनी ऐन उन्हाळ्यात १५ गुंठे शेतीत १० क्विंटल उन्हाळी ज्वारीचे उत्पादन घेतले आहे.
साडेतीन महिन्यांत ४० हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले. फोंडे यांनी बिरोबाचा माळ परिसरातील शेतात १५ गुंठे क्षेत्रांत ज्वारीची पेरणी केली होती. लेंडीखत टाकून उभी-आडवी नांगरणी केली.
रोटर मारून साडेतीन फुटांची सरी सोडली. उन्हाळी ज्वारी टोकन पद्धतीने टोकली. पाच किलो बी वापरले. सरी सोडल्याने पिकामध्ये हवा खेळती राहिली.
तीन महिन्यांत विहिरीच्या पाण्याचे योग्य नियोजन व औषध फवारणी केल्याने लष्करी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले.
दहा क्विंटल ज्वारीचा उतारा मिळाला. यामध्ये त्यांना कृषीमित्र तुषार जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.
बाजारात सध्या ज्वारीचा भाव प्रतिक्विंटल ४००० रुपये आहे. या हिशोबाने त्यांना ४० हजार रुपयांचे उत्पादन घेण्यात त्यांना यश आल्याचे रामचंद्र फौंडे यांनी सांगितले.
अधिक वाचा: शेतात गाळ भरताय? कोणत्या प्रकारचा गाळ भरणे योग्य? जाणून घ्या सविस्तर