Lokmat Agro >शेतशिवार > Fal Pik Vima Yojana : महसूल मंडळातून ट्रिगर कार्यान्वित न झाल्यामुळे आंबा बागायतदारांना फटका

Fal Pik Vima Yojana : महसूल मंडळातून ट्रिगर कार्यान्वित न झाल्यामुळे आंबा बागायतदारांना फटका

Weather based fruit Crop Insurance trigger cant hit in konkan that's why major loss of mango grower farmers | Fal Pik Vima Yojana : महसूल मंडळातून ट्रिगर कार्यान्वित न झाल्यामुळे आंबा बागायतदारांना फटका

Fal Pik Vima Yojana : महसूल मंडळातून ट्रिगर कार्यान्वित न झाल्यामुळे आंबा बागायतदारांना फटका

गतवर्षी (२०२३-२४) हंगामात आंबा पिकाचे नुकसान होऊनही विमा कंपन्यांकडून परतावा समाधानकारक देण्यात आलेला नाही. शिवाय काही महसूल मंडळातून ट्रिगर कार्यान्वित न झाल्यामुळे बागायतदारांचे नुकसान झाले आहे.

गतवर्षी (२०२३-२४) हंगामात आंबा पिकाचे नुकसान होऊनही विमा कंपन्यांकडून परतावा समाधानकारक देण्यात आलेला नाही. शिवाय काही महसूल मंडळातून ट्रिगर कार्यान्वित न झाल्यामुळे बागायतदारांचे नुकसान झाले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

रत्नागिरी: गतवर्षी (२०२३-२४) हंगामात आंबा पिकाचे नुकसान होऊनही विमा कंपन्यांकडून परतावा समाधानकारक देण्यात आलेला नाही. शिवाय काही महसूल मंडळातून ट्रिगर कार्यान्वित न झाल्यामुळे बागायतदारांचे नुकसान झाले आहे.

त्यामु‌ळे या वर्षी फळपीक विमा योजनेत सहभागी होण्याबाबत बागायतदारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अवेळी पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट यामुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास भरपाई देणे ग्राह्य आहे.

कमी तापमानासाठी सलग तीन दिवस १३ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी असा निकष आहे. जिल्ह्यात १४ ते १५ अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान असते. जास्त तापमानासाठी १ मार्च ते १५ में असा कालावधी निश्चित केला आहे. मात्र, दि. ३० मेपर्यंत उच्चत्तम तापमान असते. त्यामुळे कालावधीत वाढ करणे गरजेचे आहे.

आंबा हंगाम ३० मेपर्यंत संपतो. मात्र, फळपीक विमा योजनेचा संरक्षित कालावधी १ डिसेंबर २०२४ ते १५ मे २०२५ असा निश्चित केला आहे. त्यामुळे १५ मेनंतर उच्चतम तापमान किंवा अवेळी पावसामुळे पिकाचे नुकसान झाल्यास ग्राह्य धरले जात नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, बागायतदारांकडून निकष बदलण्याची मागणी वारंवार केली जात आहे.

मात्र, विमा कंपन्यांकडून त्याला वाटाण्याच्या अक्षता दाखविल्या जात आहेत. दरवर्षी बागायतदार लाखो रुपये भरून विमा योजनेत सहभागी होतात; परंतु, अपेक्षित परतावा मिळत नसल्याने बागायतदारांचे दुहेरी नुकसान होत आहे. त्यामुळे या योजनेचा प्रतिसाद कमी झाला आहे.

तापमापक यंत्रे अक्षम
जिल्ह्यात महसूल मंडळांतर्गत तापमापक यंत्र बसविली आहेत. मात. ती पुरेशी सक्षम नसल्यामुळे हवामानातील बदल नोंदविण्यात अक्षम ठरतात. ग्रामपंचायत स्तरावर तापमापक यंत्रे बसविण्याची योजना अद्याप धूळखात पडली आहे. परिणामी, शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

तरच भरपाई देणे ग्राह्य
- सलग तीन दिवस २३ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी असा निकष.
- जास्त तापमानासाठी १ मार्च ते २५ मे असा कालावधी निश्चित.

Web Title: Weather based fruit Crop Insurance trigger cant hit in konkan that's why major loss of mango grower farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.