सातारा : राज्य शासनाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यामध्ये अनुसूचित जाती-जमाती तसेच नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी योजना असून यामधून अडीच लाखांपर्यंत अनुदान मिळत आहे.
नवीन विहीर खुदाई, जुनी विहीर दुरुस्ती, विद्युत पंपसंच, वीजजोडणी यासाठीही पैसे मिळत आहेत. यासाठी अर्ज करण्याची गरज आहे. राज्य तसेच केंद्र शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवते. काही योजना या १०० टक्के अनुदानावर असतात. तर काहींना २५, ५० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते.
यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत होत असते. तसेच यातून अनेक शेतकरी सधन झाले आहेत. तर राज्य शासनाच्या वतीने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविली जाते.
त्याचबरोबर अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येते. आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी या योजनांचा लाभ घेतलेला आहे.
कशासाठी किती अनुदान?१) सिंचन विहिरीसाठी अडीच लाखदोन्ही प्रवर्गातील शेतकऱ्यांना सिंचन विहीर खुदाईसाठी अधिकाधिक अडीच लाखापर्यंत अनुदान देण्यात येत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी मदत होत आहे. या विहिरीमुळे पिकांना पाण्याची शास्वत सोय होत आहे.२) विद्युत पंपसंचासाठी २० हजारशेतकऱ्यांनी विहीर खुदाई केली किवा काहींच्या विहिरीसाठी विद्युत पंप संच लागतो. यासाठीही शासनाच्या वतीने १० अश्वशक्ती पर्यंतच्या पंपासाठी तसेच डिझेल इंजिनसाठी २० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळत आहे.३) वीजजोडणीसाठी १० हजारविहिरीवरील विद्युत पंप जोडणीसाठी वीज लागते. यासाठीही शासन अनुदान देते. वीजजोडणी आकारासाठी १० हजार रुपयांपर्यंत अनुदान आहे.४) जुनी विहीर दुरुस्ती ५० हजारया प्रवर्गातील शेतकऱ्यांची जुनी विहीर असेल तर त्याच्या दुरुस्तीसाठी ही अनुदान आहे. यासाठी ५० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते. या अनुदानातून शेतकरी विहिरीची डागडुजी करु शकतात.५) सूक्ष्म सिंचन सचास ५० हजारशेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी सूक्ष्म सिंचन संच लागतो. या अंतर्गत ठिबक संचासाठी ५० हजार तर तुषार संचासाठी २५ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळत आहे.
लाभासाठी हे आहेत निकषडॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी अर्जदार अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी अर्जदार अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा. नवीन विहिरींसाठी किमान ०.४० हेक्टर तर इतर बाबींसाठी ०.२० हेक्टर क्षेत्र गरजेचे आहे.
हे अनुदान यांनाच देयडिझेल इंजिन, परसबाग आणि पाईप्स या बाबीचा लाभ केवळ बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतील लाभार्थ्यांना देय आहे. परसबागसाठी ५०० रुपये तर पाईप्ससाठी ३० हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळत आहे.
महाडीबीटी पोर्टलवर करा अर्जया योजनांचा लाभ घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ आहे. योजनेसाठी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर आपला अर्ज करायचा आहे. तरच लाभासाठी शेतकऱ्यांची नोंदणी होत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणी करावी. तसेच योजनेच्या अधिक माहितीसाठी पंचायत समितीतील कृषी अधिकारी किवा गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून लाभ घ्यावा. - विजय माईनकर, जिल्हा कृषी विकास अधिकारी