Lokmat Agro >शेतशिवार > Marathwada are waiting for rain : मराठवाड्यासह पश्चिम व उत्तर महाराष्ट्राला पावसाची प्रतीक्षा 

Marathwada are waiting for rain : मराठवाड्यासह पश्चिम व उत्तर महाराष्ट्राला पावसाची प्रतीक्षा 

West and North Maharashtra including Marathwada are waiting for rain  | Marathwada are waiting for rain : मराठवाड्यासह पश्चिम व उत्तर महाराष्ट्राला पावसाची प्रतीक्षा 

Marathwada are waiting for rain : मराठवाड्यासह पश्चिम व उत्तर महाराष्ट्राला पावसाची प्रतीक्षा 

Marathwada are waiting for rain : गोदावरीच्या पाणलोट क्षेत्राकडे पावसाने पाठ फिरवल्याने छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नगर या जिल्ह्यांना चांगल्या पावसाची अपेक्षा

Marathwada are waiting for rain : गोदावरीच्या पाणलोट क्षेत्राकडे पावसाने पाठ फिरवल्याने छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नगर या जिल्ह्यांना चांगल्या पावसाची अपेक्षा

शेअर :

Join us
Join usNext

Marathwada are waiting for rain : 
राज्यात पाऊस (rain)  धो-धो बरसत असला, तरी मराठवाड्यासह पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांत पावसाने तडी दिली आहे. 
गोदावरी नदीवरील पाणलोट क्षेत्रात छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहमदनगर या तिन्ही जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्यांत पावसाने अपेक्षित हजेरी लावलेली दिसत नाही. 

त्यामुळे, गोदावरी पाणलोट क्षेत्राला मोठ्या पावसाची अपेक्षा आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस न झाल्यामुळे ७४९ लहान, ११ मोठे व मध्यम ७५ मिळून ८७७ प्रकल्प अद्यापही तहानलेलेच आहेत. विभागात ५९.५ टक्के पाऊस सध्या झाल्याचे चित्र पहायला मिळते. 

मराठवाड्याची स्थिती
विभागातील आठ जिल्ह्यांत २९ जुलैरोजी पर्यंत वार्षिक सरासरीच्या तुलनेत ६० दिवसांत ५९.९ टक्के पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरी ६७९.५ मिमी पाऊस पडतो. 
त्या तुलनेत २९ जुलै रोजी ३८०.१ मिमी पाऊस विभागात झाला आहे.
परंतु वस्तुस्थिती पाहिली तर हा पाऊस पेरण्यांसाठी पूरक आणि धरणे भरण्याच्या दृष्टीने अपुरा झाला आहे.  गोदावरी नदीसह ११ नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्याने नद्या प्रवाही झालेल्या दिसत नाहीत. परिणामी प्रकल्पाने आता तळ गाठायला सुरूवात केली आहे. 
पावसाळ्याचे दोन महिने सरत आले असून, उर्वरित काळात पावसाने दडी मारली तर आगामी काळात पाणीटंचाईचा मोठा प्रश्न उभा राहणार आहे.

नाशिकची परिस्थिती 
नाशिक जिल्ह्याची वार्षिक सरासरी ९३३ मि.मी. असून आजवर ३८९ मि.मी. पाऊस झाला आहे. फक्त ४१ टक्के पाऊस पडला आहे.

नगरमध्ये किती पाऊस?
अहमदनगर जिल्ह्याची वार्षिक सरासरी ४४८ मि.मी असून आजवर ३२६ मि.मी. पाऊस झाला आहे. ७२ टक्के हा पाऊस आहे.

पाऊस आणि पेरण्यांची स्थिती
• मराठवाड्यात किती पाऊस? : ५९.५ टक्के
वार्षिक सरासरी: ६७९.५ मि.मी.
जूनपासून २९ जुलै रोजी पर्यंत पाऊस : ४०४.२ मि.मी.

२९ जुलै रोजी सकाळपर्यंत पाऊस : ४.४ मि.मी.
जुलै महिन्यात पाऊस २२०.१ मि.मी. पेरण्या किती? : १०० टक्के
• ११ मोठ्या प्रकल्पांत जलसाठा: १९.६५ टक्के

जिल्हानिहाय आतापर्यंत झालेला पाऊस
नांदेड ५४
हिंगोली ५२
परभणी  ५१
जालना ६१
छत्रपती संभाजीनगर ६२
लातूर ६४
धाराशिव ६७
बीड ६९
एकूण : ५९ 
(सदर आकडेवारी टक्क्यांमध्ये)


 

Web Title: West and North Maharashtra including Marathwada are waiting for rain 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.