रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकापैकी हरभरा हे क्रमांक एकचे महत्वाचे कडधान्य पीक आहे. राज्यात या पिकाच्या क्षेत्रामध्ये अतिशय भरघोस अशी वाढ झाली आहे. सन २०२१-२२ मध्ये महाराष्ट्र राज्यात हरभरा पिकाचे क्षेत्र २८.३८ लाख हेक्टर, उत्पादन ३२.७७ लाख टन तर उत्पादकता ११५६ किलो/हेक्टर अशी आहे. देशाच्या एकूण हरभरा उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा २३.४४ टक्के आहे.
हरभरा पिकाची उत्पादन वाढवायचे असेल तर हरभरा पेरणीसाठी सुधारित वाण निवडणे जरुरीचे आहे. देशी हरभऱ्यामध्ये विजय, विशाल, दिग्विजय, फुले विक्रम, फुले विक्रांत आणि फुले विश्वराज हे वाण मर रोग प्रतिकारक्षम असून, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य आहेत आणि काबुली हरभऱ्यामध्ये विराट, पी. के.व्ही -२ (काक-२) पीकेव्ही-४ आणि कृपा हे वाण अधिक उत्पादन देणारे आहेत. यापैकी विजय, दिग्विजय, फुले विक्रम आणि फुले विश्वराज हे देशी वाण कोरडवाहूसाठी अतिशय चांगले आहेत. पाण्याची उपलब्धता असेल तर खतमात्रा व पाण्यास ते चांगले प्रतिसाद देतात. या शिवाय फुले विक्रांत हा वाण बागायत लागवडीसाठी उपयुक्त आहे. विशाल हा टपोऱ्या दाण्यांचा वाण आहे. विराट हा काबुली वाण अधिक उत्पादनशील व मर रोगाला प्रतिकारक्षम आहे. फुले विक्रम हा नविन वाण यांत्रीक पद्धतीने काढणी करण्यासाठी प्रसारीत केला आहे.
हरभरा पिकाचे सुधारित वाण पुढीलप्रमाणे
वाण | कालावधी | उत्पन्न (क्विं./हे.) | वैशिष्टये |
विजय | जिरायत ८५ ते ९० दिवस बागायतः १०५ ते ११० दिवस | जिरायत प्रायोगिक उत्पन्न १४-१५ सरासरी उत्पन्न १४ बागायत प्रायोगिक उत्पन्न ३५-४० सरासरी उत्पन्न १४ उशिरा पेरणी प्रायोगिक उत्पन्न १६-१८ सरासरी उत्पन्न १६ | अधिक उत्पादन क्षमता, मररोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य, अवर्षण प्रतिकारक्षम, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात राज्याकरिता प्रसारीत |
विशाल | ११० ते ११५ दिवस | जिरायत प्रायोगिक उत्पन्न: १४-१५ | आकर्षक पिवळे टपोरे दाणे, अधिक उत्पादन, मररोग प्रतिकारक, अधिक बाजारभाव, महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित |
दिविजय | जिरायत ९० ते ९५ दिवस बागायत १०५ ते ११० दिवस | जिरायत प्रायोगिक उत्पन्न १४-१५ सरासरी उत्पन्न १४ बागायत: प्रायोगिक उत्पन्न ३५-४० सरासरी उत्पन्न २३ उशिरा पेरणी: प्रायोगिक उत्पन्न २०-२२ सरासरी उत्पन्न २९ | पिवळसर तांबूस,टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित |
विराट | ११० ते ११५ दिवस | जिरायत प्रायोगिक उत्पन्न १०-१२ सरासरी उत्पन्न ११ बागायत प्रायोगिक उत्पन्न ३०-३२ सरासरी उत्पन्न १९ | काबुली वाण, अधिक टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक, महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित. |
कृपा | १०५ ते ११० दिवस | प्रायोगिक उत्पन्न ३०-३२ सरासरी उत्पन्न १८ | जास्त टपोरे दाणे असणारा काबुली वाण, दागे सफेद पांढन्या रंगाचे, सर्वाधिक बाजारभाव, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्यांकरिता प्रसारित (१०० दाण्यांचे वजन ५९.४ ग्रॅम) |
जाकी ९२१८ | १०५ ते ११० दिवस | बागायत प्रायोगीक उत्पन्न ३०-३२ सरासरी १८-२० | टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारक, जिरायत तसेच बागायत पेरणीस योग्य महाराष्ट्राकरीता प्रसारीत |
पीकेव्ही-२ | १०० ते १०५ दिवस | सरासरी उत्पन्न १२ ते १५ | अधिक टपोरे दाणे, अधिक बाजारभाव, मररोग प्रतिकारक्षम, काबुली वाण |
पीकेव्ही-४ | १०० ते ११० दिवस | सरासरी उत्पन्न १२ ते १५ | जास्त टपोरे दाणे, अधिक बाजारभाव, मररोग प्रतिकारक्षम, काबुली वाण |
बिडीएनजी ७९७ (आकाश) | १०५ ते ११० दिवस | सरासरी उत्पन्न १५ से १६ | मध्यम टपोरे दाणे, अवर्षण प्रतिकारक्षम, मररोग प्रतिकारक्षम |
फुले विक्रम | १०५ ते ११० दिवस | जिरायत प्रायोगीक उत्पन्न १६-१८ सरासरी उत्पन्न १६ बागायत प्रायोगीक उत्पन्न ३५-४० सरासरी उत्पन्न २२ उशिरा पेर प्रायोगीक उत्पन्न २०-२२ सरासरी उत्पन्न २१ | वाढीचा कल उंच असल्यामुळे यांत्रिक पध्दतीने (कंबाईन हार्वेस्टरने काढणी करण्यास उपयुक्त वाण, अधिक उत्पादन क्षमता, मर रोग प्रतिकारक, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, द.राजस्थान, उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड भागाकरीता प्रसारीत मध्यम आकाराचे दाणे. |
फुले विक्रांत | १०५ ते ११० दिवस | बागायत प्रायोगीक उत्पन्न ३५-४२ सरासरी उत्पन्न २०-०० | पिवळसर तांबुस मध्यम आकाराचे दाणे, मर रोग प्रतिकारक्षम, बागायत पेरणीकरिता योग्य, महाराष्ट्र, गुजरात, प.मध्यप्रदेश, दक्षिण राजस्थान राज्यासाठी प्रसारीत |
पी. डी. के. व्ही. कांचन | १०५ ते ११० दिवस | बागायत प्रायोगीक उत्पन्न ३०-३२ सरासरी उत्पन्न १८-२० | टपोरे दाणे, मररोग प्रतिकारक्षम जिरायत तसेच बागायत पेरणीस विदर्भ विभागासाठी प्रसारीत |
पी.डी.के.व्ही. कनक | १०८ ते ११० दिवस | सरासरी उत्पन्न १८-२० | यांत्रिक पद्धतीने काढणी करण्यास उपयुक्त बाग, मध्यम टपोरे दाणे, मर रोग सहनशील, संरक्षित ओलीताखाली लागवडीसाठी शिफारस महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश राज्यांसाठी प्रसारित |
फुले विश्वराज | ९५ ते १०५ दिवस | जिरायत प्रायोगीक उत्पन्न २८-२९ सरासरी १५ | पिवळसर टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारक्षम, जिरायत पेरणीस योग्य, पश्चिम महाराष्ट्राकरीता प्रसारित |
कडधान्य सुधार प्रकल्प
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी