Join us

हरभरा पिकाचे सुधारित वाण कोणते?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2023 2:45 PM

राज्यात या पिकाच्या क्षेत्रामध्ये अतिशय भरघोस अशी वाढ झाली आहे. सन २०२१-२२ मध्ये महाराष्ट्र राज्यात हरभरा पिकाचे क्षेत्र २८.३८ लाख हेक्टर, उत्पादन ३२.७७ लाख टन तर उत्पादकता ११५६ किलो/हेक्टर अशी आहे.

रब्बी हंगामात घेतल्या जाणाऱ्या पिकापैकी हरभरा हे क्रमांक एकचे महत्वाचे कडधान्य पीक आहे. राज्यात या पिकाच्या क्षेत्रामध्ये अतिशय भरघोस अशी वाढ झाली आहे. सन २०२१-२२ मध्ये महाराष्ट्र राज्यात हरभरा पिकाचे क्षेत्र २८.३८ लाख हेक्टर, उत्पादन ३२.७७ लाख टन तर उत्पादकता ११५६ किलो/हेक्टर अशी आहे. देशाच्या एकूण हरभरा उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा २३.४४ टक्के आहे.

हरभरा पिकाची उत्पादन वाढवायचे असेल तर हरभरा पेरणीसाठी सुधारित वाण निवडणे जरुरीचे आहे. देशी हरभऱ्यामध्ये विजय, विशाल, दिग्विजय, फुले विक्रम, फुले विक्रांत आणि फुले विश्वराज हे वाण मर रोग प्रतिकारक्षम असून, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य आहेत आणि काबुली हरभऱ्यामध्ये विराट, पी. के.व्ही -२ (काक-२) पीकेव्ही-४ आणि कृपा हे वाण अधिक उत्पादन देणारे आहेत. यापैकी विजय, दिग्विजय, फुले विक्रम आणि फुले विश्वराज हे देशी वाण कोरडवाहूसाठी अतिशय चांगले आहेत. पाण्याची उपलब्धता असेल तर खतमात्रा व पाण्यास ते चांगले प्रतिसाद देतात. या शिवाय फुले विक्रांत हा वाण बागायत लागवडीसाठी उपयुक्त आहे. विशाल हा टपोऱ्या दाण्यांचा वाण आहे. विराट हा काबुली वाण अधिक उत्पादनशील व मर रोगाला प्रतिकारक्षम आहे. फुले विक्रम हा नविन वाण यांत्रीक पद्धतीने काढणी करण्यासाठी प्रसारीत केला आहे.हरभरा पिकाचे सुधारित वाण पुढीलप्रमाणे

वाणकालावधीउत्पन्न (क्विं./हे.)वैशिष्टये
विजयजिरायत ८५ ते ९० दिवसबागायतः १०५ ते ११० दिवसजिरायत प्रायोगिक उत्पन्न १४-१५सरासरी उत्पन्न १४बागायत प्रायोगिक उत्पन्न ३५-४०सरासरी उत्पन्न १४उशिरा पेरणी प्रायोगिक उत्पन्न १६-१८सरासरी उत्पन्न १६अधिक उत्पादन क्षमता,मररोग प्रतिकारक,जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य,अवर्षण प्रतिकारक्षम,महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात राज्याकरिता प्रसारीत
विशाल११० ते ११५ दिवस

जिरायत प्रायोगिक उत्पन्न: १४-१५सरासरी: १३बागायत प्रायोगिक उत्पन्न: ३०-३५सरासरी उत्पन्न: २०

आकर्षक पिवळे टपोरे दाणे,अधिक उत्पादन,मररोग प्रतिकारक,अधिक बाजारभाव,महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित
दिविजयजिरायत ९० ते ९५ दिवसबागायत १०५ ते ११० दिवसजिरायत प्रायोगिक उत्पन्न १४-१५सरासरी उत्पन्न १४बागायत: प्रायोगिक उत्पन्न ३५-४०सरासरी उत्पन्न २३उशिरा पेरणी: प्रायोगिक उत्पन्न २०-२२सरासरी उत्पन्न २९पिवळसर तांबूस,टपोरे दाणे,मररोग प्रतिकारक,जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्यमहाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित
विराट११० ते ११५ दिवसजिरायत प्रायोगिक उत्पन्न १०-१२सरासरी उत्पन्न ११बागायत प्रायोगिक उत्पन्न ३०-३२सरासरी उत्पन्न १९काबुली वाण,अधिक टपोरे दाणे,मररोग प्रतिकारक,महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित.
कृपा१०५ ते ११० दिवसप्रायोगिक उत्पन्न ३०-३२सरासरी उत्पन्न १८जास्त टपोरे दाणे असणारा काबुली वाण,दागे सफेद पांढन्या रंगाचे,सर्वाधिक बाजारभाव,महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्यांकरिता प्रसारित(१०० दाण्यांचे वजन ५९.४ ग्रॅम)
जाकी ९२१८१०५ ते ११० दिवसबागायत प्रायोगीक उत्पन्न ३०-३२सरासरी १८-२०टपोरे दाणे,मर रोग प्रतिकारक,जिरायत तसेच बागायत पेरणीस योग्यमहाराष्ट्राकरीता प्रसारीत
पीकेव्ही-२१०० ते १०५ दिवससरासरी उत्पन्न १२ ते १५अधिक टपोरे दाणे,अधिक बाजारभाव,मररोग प्रतिकारक्षम,काबुली वाण
पीकेव्ही-४१०० ते ११० दिवससरासरी उत्पन्न १२ ते १५जास्त टपोरे दाणे,अधिक बाजारभाव,मररोग प्रतिकारक्षम,काबुली वाण
बिडीएनजी ७९७ (आकाश)१०५ ते ११० दिवससरासरी उत्पन्न १५ से १६मध्यम टपोरे दाणे,अवर्षण प्रतिकारक्षम,मररोग प्रतिकारक्षम
फुले विक्रम१०५ ते ११० दिवसजिरायत प्रायोगीक उत्पन्न १६-१८सरासरी उत्पन्न १६बागायत प्रायोगीक उत्पन्न ३५-४०सरासरी उत्पन्न २२उशिरा पेर प्रायोगीक उत्पन्न २०-२२सरासरी उत्पन्न २१वाढीचा कल उंच असल्यामुळे यांत्रिक पध्दतीने (कंबाईन हार्वेस्टरने काढणी करण्यास उपयुक्त वाण,अधिक उत्पादन क्षमता,मर रोग प्रतिकारक,जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य,महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, द.राजस्थान, उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड भागाकरीता प्रसारीत मध्यम आकाराचे दाणे.
फुले विक्रांत१०५ ते ११० दिवसबागायत प्रायोगीक उत्पन्न ३५-४२सरासरी उत्पन्न २०-००पिवळसर तांबुस मध्यम आकाराचे दाणे,मर रोग प्रतिकारक्षम,बागायत पेरणीकरिता योग्य,महाराष्ट्र, गुजरात, प.मध्यप्रदेश, दक्षिण राजस्थान राज्यासाठी प्रसारीत
पी. डी. के. व्ही. कांचन१०५ ते ११० दिवसबागायत प्रायोगीक उत्पन्न ३०-३२सरासरी उत्पन्न १८-२०टपोरे दाणे,मररोग प्रतिकारक्षमजिरायत तसेच बागायत पेरणीस विदर्भ विभागासाठी प्रसारीत
पी.डी.के.व्ही. कनक१०८ ते ११० दिवससरासरी उत्पन्न १८-२०यांत्रिक पद्धतीने काढणी करण्यास उपयुक्त बाग,मध्यम टपोरे दाणे,मर रोग सहनशील,संरक्षित ओलीताखाली लागवडीसाठी शिफारसमहाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश राज्यांसाठी प्रसारित
फुले विश्वराज९५ ते १०५ दिवसजिरायत प्रायोगीक उत्पन्न २८-२९सरासरी १५पिवळसर टपोरे दाणे,मर रोग प्रतिकारक्षम,जिरायत पेरणीस योग्य,पश्चिम महाराष्ट्राकरीता प्रसारित

कडधान्य सुधार प्रकल्पमहात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी

टॅग्स :पीकरब्बीशेतकरीशेतीमहाराष्ट्र