Lokmat Agro >शेतशिवार > काय सांगताय.. काळे गाजर अन् साडेतीन फूट कणसाची बाजरी

काय सांगताय.. काळे गाजर अन् साडेतीन फूट कणसाची बाजरी

what are you saying Black carrots and three and a half feet of pearl millet panicle | काय सांगताय.. काळे गाजर अन् साडेतीन फूट कणसाची बाजरी

काय सांगताय.. काळे गाजर अन् साडेतीन फूट कणसाची बाजरी

बारामती येथे आयोजित अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, संचलित कृषि विज्ञान केंद्राच्या 'कृषिक' हे जागतिक स्तरावरील कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना डिजिटल शेतीचे धडे मिळाले. यंदा 'एआय' तंत्रज्ञानाबरोबरच रंगीत कोबी, काळे गाजर, एक किलोचा कांदा, लाल आणि निळे केळी, पांढरा झेंडू, साडेतीन फूट कणीस असणारी तुर्कस्थानची बाजरी, पाण्यावरील बटाट्याची शेती, हवेतील भाजीपाला, लाल भेंडी, रंगीत कोबी, लाल मुळा, लाल फणस मोठे आकर्षण ठरले.

शेअर :

Join us
Join usNext

रंगीत फुलकोबी लाल मुळा, १ किलो वजनाचा कांदा करटोली, लांब वांगे, हॉपशूट, चिया, तुर्कस्थांची बाजरी, मिलेटचे जास्त उत्पन्न देणारे वाण निळे लाल केळी, विविध फळ पिके, रामभुतान, पिअर, पिच, प्लम, लिची, सफरचंद, अवाकाडो, ब्लुबेरी, रासबेरी, फुल पिके, चेरी, लाल फणस, रोजमेरी, थाईम, ऑरगॅनो, सेज, अॅस्परेंगस इ. पीक प्रात्याक्षिके पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. यंदा प्रथमच भविष्यातील डिजिटल शेती संपूर्ण देशातील शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिकासह अनुभवली.

कृषी विकास प्रतिष्ठानचे चेअरमन राजेंद्र पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलवडे यांची शेतकऱ्यांनी भेट घेत याबाबत चर्चा केली, तसेच शेतीला 'अच्छे दिन' आणणारे हे तंत्रज्ञान असल्याची प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शिवाय हवामानातील बदल शेतकऱ्यांसाठी अडचणीचा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर शेतीमालाचा रंग, चव, आकार, वजनात दर्जेदार शेती उत्पादन भविष्यात घेणे शक्य होणार आहे.

अधिक वाचा: पॅक हाऊस, कोल्ड स्टोरेज, रेफ्रिजरेटर व्हॅन, रायपनिंग चेंबर व कोल्ड चेन अनुदानासाठी कुठे कराल अर्ज?

शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमतेच्या (एआय तंत्रज्ञान) वापरावर आधारित शेतकऱ्यांच्या कौतुकाचा विषय ठरली. यामध्ये या तंत्रज्ञानाच्या वापराशिवाय आणि वापरासह घेतलेली शेतीपिके पाहून शेतकऱ्याच्या भुवया उंचावल्या. विशेषतः शेतकऱ्याचे नगदी पीक म्हणून ओळखले जाणारे ऊसपिकाचे वजन आणि साखर उतारा या तंत्रज्ञानाच्या वापराने फायदेशीर होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अर्थव्यवस्था साखर उद्योगावर अवलंबून आहे. एआय मुळे यावर भविष्यात सकारात्मक बदल दिसून येण्याचे संकेत आहेत.

या वर्षी नेदरलँड, चीन, अमेरिका, इस्त्राइल, ब्राझिल, स्पेन, इटली, जर्मनी, अफ्रिका, फ्रान्स, थायलंड, कोरिया, जपान, इंग्लंड (यूके), मेक्सिको, स्विडेन, तुर्कस्थान, ऑस्ट्रेलिया इत्यादि देशांतील विविध एआय, सेन्सर व रोबोटिक तंत्रज्ञान बियाणे खते, औषधे, मशीनरी, पॉलीहाउस, लागवड तंत्रज्ञान, स्मार्ट टुल्स शेतकऱ्यांनी अनुभवले.

सेन्सार, ड्रोन, रोबोटीक्स, सॅटेलाईट मॅपिंग, रिमोट सेन्सिंग इ. तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी त्यांच्या शेतात सुयोग्य प्रमाणात खत, पाणी व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, उत्पादनाची गुणवत्ता, सुयोग्य काढणी पश्चात तंत्रज्ञान, उत्पन्नाचा अंदाज, हवामान बदलानुसार पिक पद्धतीचे नियोजन, बाजारभावाचा अंदाज, जमिनीची उत्पादकता, मातीची गुणवत्ता, रासायनिक खतांचा वापर, यासाठी जमिनीतील सेन्सर, ड्रोन, रोबोट, व सेटेलाईटद्वारे संपूर्ण प्रक्षेत्राचे नियोजन करणे शक्य झाले आहे. कृषी प्रदर्शनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांनी हा बदल अनुभवला. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) चा वापर करून ऊस उत्पादनवाढीचे तंत्रज्ञान फायदेशीर ठरणार आहे.

कृषी प्रदर्शनात पोमॅटो आणि ब्रिमॅटोची चर्चा
■ एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचा अनोखा प्रयोग शेतकऱ्यांनी अनुभवला, प्रदर्शनात पोमॅटो आणि ब्रिमॅटोची चर्चा होती.
■ पोमॅटो म्हणजे पोटॅटो आणि टोमॅटो यांचा संकर, तर ब्रिमॅटो म्हणजे एकाच खोडाला वांगे आणि दुसप्या फांदीवर टोमॅटो लगडल्याचे दिसून आले. एकाच पिकामध्ये एकाच पाण्यामध्ये दोन पिके घेण्याचा हा अफलातून प्रयोग आहे.
■ यामध्ये बटाट्याचे खोड आणि त्याला टोमॅटोचा कृत्रिम कलमाचा हा प्रयोग आहे. यामध्ये जमिनीच्या वरच्या बाजूला टोमॅटो लागतात, तर जमिनीच्या खालच्या बाजूला बटाटे लागतात. याला पोटॅटो आणि टोमॅटो त्याचा एकत्रित म्हणून पोमॅटो असे नाव दिले जाते.

Web Title: what are you saying Black carrots and three and a half feet of pearl millet panicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.