Lokmat Agro >शेतशिवार > महाराष्ट्रातील संत्री उत्पादकांची कोंडी, नुकसानाची टांगती तलवार डोक्यावर कशामुळे?

महाराष्ट्रातील संत्री उत्पादकांची कोंडी, नुकसानाची टांगती तलवार डोक्यावर कशामुळे?

What caused the dilemma of orange growers in Maharashtra, the hanging sword of loss? | महाराष्ट्रातील संत्री उत्पादकांची कोंडी, नुकसानाची टांगती तलवार डोक्यावर कशामुळे?

महाराष्ट्रातील संत्री उत्पादकांची कोंडी, नुकसानाची टांगती तलवार डोक्यावर कशामुळे?

या निर्णयामुळे नागपूरची संत्री विदेशी होईना निर्यात, नक्की प्रकरण काय? जाणून घ्या...

या निर्णयामुळे नागपूरची संत्री विदेशी होईना निर्यात, नक्की प्रकरण काय? जाणून घ्या...

शेअर :

Join us
Join usNext

निर्यातबंदीने महाराष्ट्राच्या कांदा उत्पादकांनंतर आता संत्री उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीही वाढल्या आहेत. बांग्लादेश सरकारने घातलेल्या कडक नियामांमुळे भारतीय संत्रा उत्पादकांची निर्यात घटली आहे.  त्यामुळे यंदा संत्रा उत्पादकांना तोटा सहन करावा लागत आहे.

आंतराष्ट्रीय व्यापाऱ्याच्या गुंतागुंतीच्या जाळ्यात अडकल्यामुळे संत्रा उत्पादकांना नुकसानीची टांगती तलवार आहे. महाराष्ट्रातील नागपूरच्या संत्र्याची परदेशात मोठी मागणी असून बांग्लादेश त्याची मोठी बाजारपेठ आहे. पण बाग्लादेशाने आयात शुल्कात वाढ केल्याने संत्र्याची मागणी घटली आहे.

संत्रा उत्पादक शेतकरी मागील वर्षीपर्यंत ६००० टन संत्री बांग्लादेशला पाठवत असत. पण ढाकाने २०२३ च्या नोव्हेंबरमध्ये आयात शुल्क २० रुपये प्रतिकिलोवरून ८८ रुपये प्रतिकिलो एवढे वाढवल्याने महाराष्ट्रातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे.

आयात शुल्क वाढल्याने भारतीय संत्री महागली

आयात शुल्कात वाढ झाल्याने बांग्लादेशातील संत्र्याच्या किमती झपाट्याने वाढल्या आहेत. देशांतर्गत बाजारपेठेचे रक्षण करण्यासाठी भारताने बांग्लादेशच्या कांदा निर्यातीवर बंदी घातली असल्याचे विदर्भातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सरकारने करावा हस्तक्षेप

केंद्र सरकारने बांग्लादेशला निर्यात होणाऱ्या कांद्यावरील सवलतीत वाढ केल्यास ढाकाही संत्र्यावरील आयातशुल्क कमी करेल असे संत्री व्यापाऱ्यांकडून मागणी होत आहे.

Web Title: What caused the dilemma of orange growers in Maharashtra, the hanging sword of loss?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.