Join us

एशियन सिट्रस काँग्रेस’ने संत्रा उत्पादकांना काय दिले?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 8:21 AM

एशियन सिट्रस काँग्रेस’ साेमवारी (दि. ३०) सांगता झाली. यात जगभरातील १६ देशांमधील १०० पेक्षा अधिक लिंबूवर्गीय फळ शास्त्रज्ञ आणि संशाेधकांनी माेलाचे मार्गदर्शन केले.

सुनील चरपेनागपूर : ‘एशियन सिट्रस काँग्रेस’ साेमवारी (दि. ३०) सांगता झाली. यात जगभरातील १६ देशांमधील १०० पेक्षा अधिक लिंबूवर्गीय फळ शास्त्रज्ञ आणि संशाेधकांनी माेलाचे मार्गदर्शन केले. हे विचार विदर्भातील संत्रा-माेसंबी उत्पादकांपर्यंत पाेहाेचवून त्याची काटेकाेर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ‘सीसीआरआय’वर आहे.

‘एशियन सिट्रस काँग्रेस’मध्ये बाेराॅन-झिंक नॅनाे टेक्नाॅलाॅजी, एचएलबी आजार, पाणी कमतरता, मृदा सर्वेक्षण, राेगांवर प्रतिबंधात्मक उपाययाेजना, उत्पादन व गुणवत्ता वाढविणे, ग्लाेबल वाॅर्मिंग व हवामान बदल, तंत्रज्ञान आदानप्रदान यासह अन्य महत्त्वाच्या विषयांवर विचार व्यक्त करण्यात आले. मुळात नागपुरी संत्र्याला फळगळ, ग्रीनिंग, काेळशी, हवानामातील बदल, तापमानातील वाढ यासह अन्य घातक समस्यांनी घेरले आहे.

दर्जेदार उत्पादनासाठी कलमांची गुणवत्ता, मातीचे आराेग्य, मातीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण व पीएच, ओलीत व फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची शुद्धता, पाण्याचे प्रमाण, जमिनीतील पाण्याचा निचरा, झाडांची छाटणी, बागा राेग व कीडमुक्त ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययाेजना, मूल्यवर्धनासाठी फळांचे आयुष्य वाढविण्याचे तंत्रज्ञान, फळांवरील प्रक्रिया उद्याेग या अत्यंत महत्त्वाच्या व मूलभूत बाबीं शास्त्रीय दृष्टिकाेनातून भर देणे आणि त्या संत्रा उत्पादकांना करायला लावणे अत्यावश्यक आहे.

कमी उत्पादकता एक आव्हानविदर्भातील नागपुरी संत्र्याची उत्पादकता फारच कमी म्हणजे प्रति हेक्टर सात ते आठ टन एवढी आहे. मध्य प्रदेश व राजस्थानातील नागपुरी संत्र्याची उत्पादकता २० ते २० टन, पंजाबमधील किन्नाे संत्र्याची २६ टन तर इतर देशांमधील संत्र्याची प्रति हेक्टरी उत्पादकता ही ५० ते ७० टन आहे. त्यामुळे विदर्भातील नागपुरी संत्र्याची उत्पादकता वाढविण्याचे ‘सीसीआरआय’समाेर एक आव्हान आहे.

गैरसमज माेडीतजगात फळांमध्ये सर्वाधिक संत्र्याचा ज्यूस पिण्यासाठी वापरला जाताे. नागपुरी संत्रा ज्यूससाठी याेग्य नसल्याचे आजवर मानले जायचे. मात्र, नांदेड येथील सह्याद्री फार्मरच्या संत्रा प्रक्रिया कारखान्याने ही गैरसमज माेडीत काढला आहे. त्यामुळे या दिशेने उपाययाेजना करून प्रक्रिया उद्याेग उभारणे गरजेचे आहे.

नवीन जाती आवश्यकइस्रायलमध्ये संत्र्याच्या १२ जाती असून, यातील चार जाती सीडलेस आहेत. त्या टेबल फ्रूट म्हणून तर इतर आठ जातींचा संत्रा प्रक्रिया करण्यासाठी वापरला जातो. स्पेनमध्ये संत्र्याच्या आठ जाती आहेत. त्याअनुषंगाने संशाेधन करून नागपुरी संत्र्याच्या नवीन जाती विकसित करणे व त्या शेतकऱ्यांपर्यंत पाेहाेचविण्याचे आव्हान ‘सीसीआरआय’समाेर राहणार आहे.

सिट्रस काँग्रेसमध्ये शास्त्रज्ञ आणि संशाेधकांनी मांडलेल्या विचारांचा आपल्याला काय फायदा हाेऊ शकताे, याबाबत संत्रा उत्पादकांमध्ये उत्सुकता आहे. या विचारांची तंताेतत अंमलबजावणी व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने संत्रा व माेसंबीचे उत्पादन घेण्याबाबत मार्गदर्शन करायला हवे. - श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज.

टॅग्स :शेतकरीनागपूरशेतीविदर्भपंजाबइस्रायल