आरोग्य विभांगाकडून बालकांमधील कुपोषणमुक्तीसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. नव्या संशोधनानुसार, मातीच्या भांड्यात अन्न शिजवून खाल्यास कुपोषणाचे प्रमाण कमी होऊ शकते, असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे.
जयपूरच्या अमृत माटी इंडिया ट्रस्टने केलेल्या संशोधनात मातीत विविध प्रकारचे पोषक घटक असतात. त्यामुळे मातीच्या भांड्यांमध्ये अन्नपदार्थ शिजवल्यामुळे ते अधिक पोषक होतात. एवढेच नव्हे, तर महिलांमधील अॅनिमिया तसेच खनिजांची कमतरता दूर करण्यासही मदत होईल.
पचन होईल योग्यमातीच्या भांड्यात क्षाराचे प्रमाण अधिक असल्याने अन्नातील पीएच पातळी संतुलित राखता येते. त्यामुळे पचन योग्य पद्धतीने होण्यास मदत होते.
पोषणमूल्ये कोणात किती?घटक प्रेशर कुकर मातीची भांडीकर्बोदके ४१.५७ ग्रॅम ५०.७३ ग्रॅमफायबर ९. ६४ ग्रॅम १६.६४ ग्रॅमप्रोटिन ११.१९ ग्रॅम १३.०८ ग्रॅमव्हिटॅमिन ए ० मिलिग्रॅम १००.५ मिलिग्रॅमव्हिटॅमिन सी १.७३ मिलिग्रॅम ३.७९ मिलिग्रॅमकॅल्शियम ११.९७ मिलिग्रॅम ३६.५३ मिलिग्रॅमलोह २.७५ मिलिग्रॅम ३.८१ मिलिग्रॅम