Lokmat Agro >शेतशिवार > राज्यात पावसाची उघडीप, मराठवाड्यातील धरणांत पाणी स्थिती काय?

राज्यात पावसाची उघडीप, मराठवाड्यातील धरणांत पाणी स्थिती काय?

What is the state of rainfall in the state, water status in dams? | राज्यात पावसाची उघडीप, मराठवाड्यातील धरणांत पाणी स्थिती काय?

राज्यात पावसाची उघडीप, मराठवाड्यातील धरणांत पाणी स्थिती काय?

राज्यात पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने अनेक विभागांमध्ये धरणांच्या पाणीसाठ्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.  मराठवाड्यातील बहुतांश धरणे तहानलेलीच असल्याचे चित्र ...

राज्यात पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने अनेक विभागांमध्ये धरणांच्या पाणीसाठ्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.  मराठवाड्यातील बहुतांश धरणे तहानलेलीच असल्याचे चित्र ...

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने अनेक विभागांमध्ये धरणांच्यापाणीसाठ्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. 

मराठवाड्यातील बहुतांश धरणे तहानलेलीच असल्याचे चित्र पाहायला मिळत असून जायकवाडी  धरणाचा पाणीसाठा ३४% एवढा झाला असून येलदरी ५९.९१ %, विष्णुपुरी ८२.६८%, माजलगाव १५.६%, पैनगंगा ६३.९७%, तेरणा २९.३६ %, मांजरा २६.४७ %, दुधना २७.१ % भरलेली आहेत. 

ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने मराठवाड्यातील  लघु मध्यम व मोठ्या प्रकल्पांसह केवळ ३५.६०%च पाणीसाठा शिल्लक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. परिणामी, छत्रपती संभाजीनगर, बीडसह अनेक जिल्ह्यांमध्ये टँकरची संख्या वाढली आहे. 

नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील लघु प्रकल्प वगळता इतर जिल्ह्यांतील लघु प्रकल्पांची स्थिती दयनीय आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९७ व बीडमधील १२६ लघु प्रकल्पात केवळ आठ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे.

पुणे विभागातील बहुतांश धरणे ७०% च्या वर भरली असून कोयना धरणात ७८.१३ % पाणीसाठा शिल्लक असून उजणी धरणात १३.२२ % पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिक व जळगाव विभागात गंगापूर दारणा कडवा ही धरणे ८०% हून अधिक भरली असून नगर विभागातील भंडारदरा ९७ %, निळवंडे ८३.७६ % धरणे भरली आहेत.

Web Title: What is the state of rainfall in the state, water status in dams?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.