राज्यात पावसाने चांगलीच उघडीप दिल्याने अनेक विभागांमध्ये धरणांच्यापाणीसाठ्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
मराठवाड्यातील बहुतांश धरणे तहानलेलीच असल्याचे चित्र पाहायला मिळत असून जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ३४% एवढा झाला असून येलदरी ५९.९१ %, विष्णुपुरी ८२.६८%, माजलगाव १५.६%, पैनगंगा ६३.९७%, तेरणा २९.३६ %, मांजरा २६.४७ %, दुधना २७.१ % भरलेली आहेत.
ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने मराठवाड्यातील लघु मध्यम व मोठ्या प्रकल्पांसह केवळ ३५.६०%च पाणीसाठा शिल्लक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. परिणामी, छत्रपती संभाजीनगर, बीडसह अनेक जिल्ह्यांमध्ये टँकरची संख्या वाढली आहे.
नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील लघु प्रकल्प वगळता इतर जिल्ह्यांतील लघु प्रकल्पांची स्थिती दयनीय आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९७ व बीडमधील १२६ लघु प्रकल्पात केवळ आठ टक्के उपयुक्त पाणी शिल्लक आहे.
पुणे विभागातील बहुतांश धरणे ७०% च्या वर भरली असून कोयना धरणात ७८.१३ % पाणीसाठा शिल्लक असून उजणी धरणात १३.२२ % पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिक व जळगाव विभागात गंगापूर दारणा कडवा ही धरणे ८०% हून अधिक भरली असून नगर विभागातील भंडारदरा ९७ %, निळवंडे ८३.७६ % धरणे भरली आहेत.