Join us

गावात राहून जनावरांना काय खाऊ घालणार? ऊसतोड मजुरांचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2023 11:15 AM

ऊसतोड कामगारांनी धरली साखर कारखान्यांची वाट...

लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार दोन-तीन वर्षांपूर्वी पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे चारा-पाण्याचा उद्भवला नव्हता. यंदा मात्र, पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगाम वाया गेला आहे. आता चारा अन् पाणीही नाही. मग गावात राहून मुक्या जनावरांना काय खाऊ घालणार? असा प्रश्न ऊसतोड मजुरांना पडला आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांनी घरदार सोडून साखर कारखान्यांची वाट धरली आहे.

बीड जिल्ह्यात ऊसतोड कामागारांची संख्या जास्त आहे. अशातच राज्याबाहेरील कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील ऊसतोड कामगार राज्यासह इतर भागांतही ऊसतोडीसाठी जात आहे. दरवर्षीच ऊसतोड कामागारांचे स्थलांतर होत असते; परंतु, यंदा दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मजुरां स्थलांतर होण्याचे प्रमाण जास्त आहे मागील दोन-तीन वर्षांत पावसा चांगली साथ दिल्याने मजुरांच स्थलांतर होण्याचे प्रमाण कमी होते यावर्षी सिंदफना मध्यम प्रकल्प सोडत तालुक्यात कुठेच पाणी नाही प्रशासनाला पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे रब्बी हंगाम कसा घेणार? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कारखान्यावर गेल्यानंतर किमान जनावरांचा चारा आणि पाण्याचा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा या तालुक्यातील शेतकऱ्यांना आहे.

टॅग्स :शेतकरीऊससाखर कारखाने