बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जानोरी गाव एकेकाळी 'गव्हाची जानोरी' (Janori wheat) म्हणून ओळखले जात होते. मात्र, या पारंपरिक गव्हाच्या (Wheat) वाणाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे.
कोरडवाहू पद्धतीने घेतला जाणारा हा गहू कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता पारंपरिक शेती (Traditional Farming) पद्धतीने तयार केला जातो, त्यामुळे त्याला विशिष्ट ओळख आहे.
हा गहू जीआय मानांकन (GI Rating) मिळवण्याच्या क्षमतेचा आहे, ज्यामुळे त्याला स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (International Market) अधिक मान्यता मिळू शकते. त्यादृष्टीने आता प्रशासकीय पातळीवरही प्रयत्न होण्याची गरज निर्माण झाली आहे. ३५ किलो बियाणे एकरी वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे.
एकरी ७ क्विंटल
* रासायनिक खताचाही वापर केल्या जात नाही. एकरी ३५ किलो बियाणे वापरून ७ क्विंटलच्या आसपास त्याचे उत्पादन होते.
* जानोरीतील दिनकर मानकर, रामेश्वर बारहाते, गजानन बारहाते, डिवरे यांनी तो पेरला आहे. राजाराम काळे हेही हा गहू पेरत होते. या गव्हाचे संवर्धन व जतनासाठी प्रयत्न गरजेचे आहे.
गव्हाची घटती लागवड
* सध्या जानोरी गावात केवळ चार शेतकऱ्यांनी पाच एकर क्षेत्रावर हा गहू पेरला आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणावर घेतला जाणारा हा गहू आता मर्यादित प्रमाणात घेतला जातोय.
* काळ्या मातीतील खारपाणपट्ट्यामुळे आणि पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीमुळे याला एक वेगळी ओळख आहे. कोरडवाहू गहू म्हणूनही तो ओळखला जातो.
जीआय मानांकनाचे फायदे
* जानोरीच्या पारंपरिक गव्हाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मान्यता मिळेल.
* शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल, ज्यामुळे आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल.
* या गव्हाच्या उत्पादनात वाढ झाल्यास, पुढील पिढ्यांसाठी हा पारंपरिक वाण सुरक्षित राहील.
गव्हाची वैशिष्ट्ये
* पारंपरिकतेची ओळख, कुरडई आणि शेवया, रोडगे बनवण्यासाठी प्रसिद्ध, जाणकार आजही १०० रुपये किलो भाव देऊन खरेदी करतात.
* साधारणतः २० दिवसांत उत्पादन हाती येते. कोरडवाहू गहू ओलीत न करता घेतला जातो, त्यामुळे त्याचा पोषणमूल्यात फरक पडत नाही.
* जतन व संवर्धनासाठी योग्य प्रयत्न आवश्यक आहेत.
या गव्हाच्या पारंपरिक वाणाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले जातील. पारंपरिक वाणाच्या संवर्धनास प्राधान्य आहे. - एम. डी. ढगे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी
हे ही वाचा सविस्तर : Rajma farming: कमी दिवसात येणारा राजमा जास्त फायद्याचा