वाशिम : सध्या राज्यात चांगलीच थंडी वाढल्याने किमान तापमानाचा पारा काही प्रमाणात घटलेला आहे. यामुळे गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने गव्हाच्या पेरण्यांना चांगलाच वेग आला आहे.
यंदा पोषक वातावरण आणि सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध असल्याने गव्हाच्या क्षेत्रात यंदा वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.
राज्यात रब्बी मधील गव्हाचे सरासरी क्षेत्र १० लाख ८५ हजार ०१२ हेक्टर आहे. त्यात २०२२ मध्ये राज्यात १० लाख ५९ हजार ९७३ हेक्टरवर पेरणी झाली होती, तर गतवर्षी राज्यात १२ लाख ८ हजार ८५० हेक्टरवर पेरणी झाली होती. अर्थात गतवर्षी सरासरीपेक्षा गव्हाचे क्षेत्र पंधरा टक्के क्षेत्र वाढले होते.
यंदाही जास्त झालेल्या पावसामुळे गव्हाच्या पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर काही भागात ढगाळ वातावरण तयार झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी उशिराने पेरण्या करण्यास सुरुवात केली.
बदलत्या वातावरणाचा फटका बसण्याचा धोका
● ढगाळ वातावरणामुळे पिकांवर अव्यांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.
● विशेषतः हरभरा, तूरीवर अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. वाटाणा व तुरीचा बहार गळण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.