Join us

गहू काढणीला आला वेग; आधुनिक हार्वेस्टरचा वापर वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 4:09 PM

सध्या सर्वत्र गहू काढणीला आला आहे. तर काही अंशी गव्हाची काढणी देखील अनेक भागात पूर्णत्वाकडे आली आहे. सोंगणी करिता होणारा मजुरी खर्च, कष्ट, यांचा विचार करता आधुनिक यंत्र हार्वेस्टरच्या मदतीने गहू काढण्याकडे अनेक शेतकर्‍याचा कळ दिसून येतो आहे. 

रविंद्र जाधव

सध्या सर्वत्र गहूकाढणीला आला आहे. तर काही अंशी गव्हाची काढणी देखील अनेक भागात पूर्णत्वाकडे आली आहे. सोंगणी करिता होणारा मजुरी खर्च, कष्ट, यांचा विचार करता आधुनिक यंत्र हार्वेस्टरच्या मदतीने गहू काढण्याकडे अनेक शेतकर्‍याचा कळ दिसून येतो आहे. 

या वर्षीच्या सुरुवातीपासूनच कमी पाऊस असल्याने यंदा गव्हाची पेरणी खालावली होती. राज्यात गतवर्षी ११ लाख ३३ हजार हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी झाली होती. मात्र या वर्षी काहीशी घट होत १० लाख ४० हजार हेक्टर गव्हाची पेरणी झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत ही लागवड केवळ ९२ टक्के एवढीच आहे. तर मागील पाच वर्षींच्या तुलनेत यंदा गव्हाची पेरणी ही ९९.१९ टक्के झाली आहे. पाच वर्षांच्या तुलनेत गव्हाची पेरणी समाधानकारक असली तरी मागच्या वर्षीच्या तुलनेत गव्हाची पेरणी ही ८ टक्क्यांनी घसरली आहे.

घरोघरी मातीच्या चुली नव्हे तर घरोघरी गव्हाची चपाती या चपातीच्या आवडीमुळे सध्या गव्हला मागणी चांगली आहे. मात्र दिवसेंदिवस होणार्‍या वातावरणीय बदलांमुळे अलिकडे गव्हाचे उत्पादन कमी झाले आहे. परंतु त्या तुलनेत गहू बियाणे पासून ते लागवड, निंदणी, खते, कीटकनाशकांची फवारणी, सोंगणी, आदी बाबतीत खर्च प्रचंड वाढले आहे.

टरबूजची परदेश वारी; आर्थिक कमाल घडली भारी 

एवढे सगळे खर्च ऐन शेतकर्‍यांच्या उंबरठ्यात गहू आला की बाजारात दर कोसळतात. त्यामुळे आपल्या घरच्या गरजेइतपतच गव्हाची लागवड करणे फायद्याचे अशी मानसिकता झाल्याचे शेतकरी सांगतात. 

आम्ही दरवर्षी गहू करतो मात्र आता नवनवीन वाणाच्या गव्हाला पहिल्यापेक्षा जास्त पाणी द्यावे लागते. तसेच व्यवस्थापन खर्च वाढला आहे पण सोबत एकरी उत्पादन देखील घटल्याने खर्च खूप करूनही हाती काहीच शिल्लक राहत नाही. त्यामुळे आता गहू क्षेत्र सुद्धा दिवसेंदिवस घटत आहे. - संदिप जाधव, शेतकरी शिऊर 

क्षेत्र कमी झाल्याने अनेकांनी बैल जोड विकल्या परिणामी वेळेवर पेरणी करायला ट्रॅक्टर बोलवावे लागते. यांत्रिकीकरण वाढल्याने आता पारंपरिक सोंगणी, मळणी फारशी होत नाही. हार्वेस्टरनेच गहू काढण्याकडे सर्वांची पसंदी आहे. - नवनाथ सोनवणे, शेतकरी वाघला.

टॅग्स :गहूपीकशेतकरीशेतीकाढणीमहाराष्ट्र