जून ते सप्टेंबर या कालावधीत बीड जिल्ह्यात ७९ टक्के पाऊस झाल्याने रब्बी हंगामात ३ लाख ३२ हजार ३५३ हेक्टरवर रब्बीच्यापेरणीचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला होता. आतापर्यंत केवळ ४४ टक्के पेरणी झाली आहे. पुढील काही दिवसात यात वाढ होऊ शकते असे अधिकाऱ्यांचे मत आहे. एक महिना उलटला तरी गव्हाचा पेरा ७ टक्केच आहे.
रब्बी हंगामाच्या अनुषंगाने जिल्हा कृषी विभागाने बी-बियाणांचे नियोजन केले आहे. कृषी विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, आतापर्यंत ३ लाख ३२ हजार ३५३ हेक्टरपैकी १ लाख ४७ हजार ४९४ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात ७९ टक्के पाऊस झाला असला तरी धरणांमध्ये पाणीसाठा उपलब्ध नाही. आतापर्यंत झालेला पाऊस हा मुर स्वरूपाचा होता.
थंडीसोबत ऊनसुद्धा
दिवाळीनंतर आता थंडी सुरु झाली. पहाटेच्या वेळी कडाक्याची थंडी पडत आहे तर दुपारच्या वेळी कडक ऊन पडत आहे. थंडी व उन्हाचा असा अजब अनुभव शेतकऱ्यांसह नागरिकांना येत T आहे. असेच तीव्र स्वरुपाचे ऊन पडत 7 गेले तर त्याचा परिणाम पिकांवर होऊ २ शकतो असे कृषी अधिकारी सांगत आहेत. डिसेंबरनंतर पिके वाढीला न लागल्यानंतर थंडी अधिक वाढेल व ती गव्हासाठी लाभदायक असेल असा अंदाजही व्यक्त केला जात आहे.
ज्वारी, हरभरा पेरा अधिक
रब्बी पीक पेरणी अहवालानुसार १६ नोव्हेंबरअखेर पर्यंत ज्वारीचा पेरा ८३३७७ हे. (५१ टक्के), गहू २९७१ हे. (८ टक्के), इतर तृणधान्य ००, इतर कडधान्य ४०० हे. (२२५ टक्के), एकूण रब्बी अन्नधान्य १४७२६८ हे. (४४ टक्के), करडई १८३ हे.(१८ टक्के), जवस ४ हे. (३ टक्के) सूर्यफूल १६ हे. [१९ टक्के), गळीत धान्य ३६ हे. (२९ टक्के) एकूण गळीत धान्य २२६ हे. (१७ टक्के) अशी एकूण रब्बी पिकासाठी १४७४९४ हेक्टरवर ४४ टक्के पेरणी झाली आहे.
पाणी टंचाई भासणार ?
- जिल्ह्याची पावसाची जून ते सप्टेंबर या कालावधीतील वार्षिक सरासरी ५६६.१ मिमी असून आतापर्यंत ४५५ मिमी म्हणजेच ७९ टक्के पावसाची नोंद झाली आहे.
- तूट केवळ २१ टक्के असल्याने कागदोपत्री अधिक पाऊस दिसत असला तरी चार महिन्यांत पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला नाही.
- परिणामी, जमिनीतील पाणी पातळी घटलेली आहे. त्यामुळे रब्बीच्या पिकांसाठी पाणी देण्याची अडचण उद्भवू शकते. शेतकन्यांना पिकांसाठी पाण्याचे नियोजन करावे लागण्याची शक्यता आहे.