चांदकखेड : श्री संत तुकाराम कारखान्याला सुरुवात करताना कारखाना सुरू होणार नाही, झाला तर चालणार नाही, असे बोलले जात होते. परंतु, जेथे भाताच्या पेंढ्याच्या गाड्या दिसत होत्या, तेथे उसाच्या गाड्या दिसू लागल्या. आज महाराष्ट्रातील हाताच्या बोटावर मोजण्यासारखे जे उत्कृष्ट कामकाज करणारे कारखाने आहेत, त्यापैकी संत तुकाराम कारखाना गणला जातो. हा संत तुकाराम महाराजांचा आशीर्वाद असल्याचे अध्यक्ष नानासाहेब नवले यांनी सांगितले.
वाकडमध्ये संत श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची ३५ वी अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा नवले यांच्या अध्यक्षतेखाली वाकडमधील संत तुकाराम कार्यालयात झाली, यावेळी नवले बोलत होते. विषयपत्रिकेवरील सर्व ठराव मंजूर करण्यात आले.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, शरद ढमाले, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, माजी सभापती एकनाथ टिळे, ज्ञानेश्वर दळवी, सविता दगडे, राजाभाऊ हगवणे, महादेव कोंढरे, भाऊसाहेब पानमंद आदी उपस्थित होते. यावेळी विषयपत्रिकेतील सर्व विषयाला उपस्थित सभासदांच्या वतीने मान्यता देण्यात आली. उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी कारखान्याची सद्यस्थिती व भविष्यातील वाटचाल याविषयी माहिती दिली.
यावेळी संचालक तुकाराम विनोदे, दिलीप दगडे, सुभाष राक्षे, शामराव राक्षे, बाळकृष्ण कोळेकर, चेतन भुजबळ, शिवाजी पवार, बाळासाहेब बावकर, मधुकर भोंडवे, महादेव दुडे, दिनेश मोहिते, प्रवीण काळजे, नरेंद्र ठाकर, सखारामगायकवाड, संचालिका शुभांगी गायकवाड, ताराबाई सोनवणे, ज्ञानेश नवले, सुभाष जाधव, प्रभारी सचिव मोहन काळोखे, कर्मचारी आदीसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेतील ठराव
आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील ताळेबंदपत्रक, नफा-तोटा पत्रक, ऑडिट मेमो स्वीकारून त्यास मंजुरी देण्यात आली. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये अंदाजपत्रकापेक्षा कमी-जास्त झालेल्या भांडवली व महसुली खर्चास मान्यता. मशीनरी विक्रीस मान्यता तसेच भंडारा डोंगर येथील संत तुकाराम महाराज मंदिर बांधकामासाठी गाळपास आलेल्या ऊस बिलातून रक्कम कपात करून देण्याबाबतचे निर्णय घेण्यात आले.
आमच्याशी व्हॉटसअप्पद्वारे जोडण्यासाठी 'या' लिंकवर क्लिक करा.
खोडवा उसात घेतले विक्रमी उत्पादन
ऊस उत्पादक शेतकरी अनिकेत बावकर (कासारसाई) यांनी खोडवा उसात विक्रमी प्रति हेक्टरी २९१.८१० मे. टन ऊस उत्पादन घेतल्याबद्दल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा ऊस भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा, तसेच पूर्वहंगामी, खोडवा प्रकारात जास्त उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
हेही वाचा : Dragon Fruit Success Story : ड्रॅगन फ्रूट मधून मिळाली उभारी; घर, गाडीसह ओळख मिळाली भारी