Join us

Soil Testing Lab : तुमच्या जिल्ह्यात माती परीक्षण प्रयोगशाळा कुठे आहे? वाचा एका क्लिकवर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 3:49 PM

आपल्या जिल्ह्यानुसार कुठे कुठे माती परीक्षण प्रयोगशाळा आहेत, हे पाहुयात सविस्तर... 

शेती क्षेत्रात मातीचे महत्व अनन्यसाधारण महत्व आहे. जशी तुमची गुणवत्ता क्षमता असेल तसे शेतीच्या उत्पन्नावर परिणाम होत असतो. माती परीक्षण म्हणजे शेतजमिनीतील अंगभूत रसायने वा जैविकांचे विश्लेषण होय. याद्वारे शेतात कोणते पीक घ्यावे हे नक्की करता येते. सध्या अनेक शेतकरी आपल्या जमिनीत माती परीक्षण करूनच पीक घेण्याला महत्व देतात. आपल्या महाराष्ट्रात अनेक माती परीक्षण प्रयोगशाळा आहेत. आपल्या जिल्ह्यानुसार कुठे कुठे माती परीक्षण प्रयोगशाळा आहेत, हे पाहुयात सविस्तर... 

`नागपूर, बुलढाणा, अमरावती, नाशिक जिल्ह्यातील प्रयोगशाळा 

नागपूर जिल्ह्यात जिल्हा माती सर्वेक्षण प्रयोगशाळा, बुलढाणा जिल्ह्यात कृषी विज्ञान केंद्राची माती परीक्षण प्रयोगशाळा, तसेच जळगाव जामोद येथील कृषी विज्ञान केंद्रातील माती आणि पाणी परीक्षण प्रयोगशाळा, अमरावती जिल्ह्यात घाटखेड येथील कृषी विज्ञान केंद्राची माती आणि पाणी परीक्षण प्रयोगशाळा तसेच दुर्गापूर येथील कृषी विज्ञान केंद्राची माती आणि पाणी परीक्षण प्रयोगशाळा, नाशिक जिल्ह्यातील कृषी महाविद्यालय मालेगाव येथील प्रयोगशाळा आणि कृषी विज्ञान केंद्र येथील प्रयोगशाळा. 

बीड, अकोला, पुणे, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, सोलापूर येथील प्रयोगशाळा 

बीड जिल्ह्यातील श्री छत्रपती शाहू फुले आंबेडकर कॉलेज ऑफ कृषी येथील माती परीक्षण प्रयोगशाळा, त्याचबरोबर बीड येथील जिल्हा माती सर्वेक्षण आणि माती परीक्षण प्रयोगशाळा, अकोला जिल्ह्यातील जिल्हा माती सर्वेक्षण आणि माती परीक्षण कार्यालय, पुणे जिल्ह्यात जिल्हा माती सर्वेक्षण आणि माती परीक्षण प्रयोगशाळा,  यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा माती परीक्षण आणि माती सर्वेक्षण कार्यालय, हिंगोली जिल्ह्यात तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्रातील माती परीक्षण प्रयोगशाळा, नांदेड जिल्ह्यातील पोखरणी येथील कृषी विज्ञान केंद्रातील माती परीक्षण प्रयोगशाळा, सोलापूर जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्रातील माती परीक्षण प्रयोगशाळा... 

रायगड, धुळे, अहमदनगर, परभणी जिल्ह्यात प्रयोगशाळा 

तसेच रायगड जिल्ह्यातील रोहा येथील कृषी विज्ञान केंद्रातील माती परीक्षण प्रयोगशाळा, धुळे जिल्ह्यातील कृषी विज्ञान केंद्रातील माती आणि पाणी परीक्षण प्रयोगशाळा आणि अहमदनगर येथील कृषी विज्ञान केंद्र दहिगाव येथील माती परीक्षण प्रयोगशाळा आणि परभणी जिल्ह्यात परभणी कृषी विज्ञान केंद्र येथील माती परीक्षण प्रयोगशाळा, त्याचबरोबर त्या त्या जिल्ह्यात खाजगी माती परीक्षण प्रयोगशाळा देखील कार्यरत असून सोबतच त्या त्या जिल्ह्यात जिल्हा माती परीक्षण प्रयोगशाळा देखील कार्यरत असून या ठिकाणी शेतकऱ्यांना काही शुल्क घेऊन माती परीक्षण केली जाते.

टॅग्स :शेतीशेती क्षेत्रनाशिकशेतकरी