Lokmat Agro >शेतशिवार > कोणत्या सुक्या मेव्यामध्ये कोणती गुणधर्मे? जाणून घ्या..

कोणत्या सुक्या मेव्यामध्ये कोणती गुणधर्मे? जाणून घ्या..

Which dry fruits have what nutritional properties? Find out.. | कोणत्या सुक्या मेव्यामध्ये कोणती गुणधर्मे? जाणून घ्या..

कोणत्या सुक्या मेव्यामध्ये कोणती गुणधर्मे? जाणून घ्या..

१०० ग्रॅम सुक्या मेव्यात नक्की किती मेद, ऊर्जा, प्रथिनं असतात?

१०० ग्रॅम सुक्या मेव्यात नक्की किती मेद, ऊर्जा, प्रथिनं असतात?

शेअर :

Join us
Join usNext

हिवाळ्यात पचनशक्ती वाढलेली असल्यामुळे या दिवसांत सुका मेवा खाण्यासाठी डॉक्टरांकडून नेहमीच सल्ला दिला जातो. हिवाळ्याच्या कालावधीत गृहिणी मेथीचे लाडू, डिंक लाडू असे पदार्थ बनविण्यात गुंतलेल्या दिसतात. मात्र खारीक, खोबरं, अंजीर, बदाम, काजू ही सुकी फळे या दिवसांत चांगलाच भाव खातात.

वाढत्या थंडीत सुक्या मेव्याचा आवर्जून वापर केला जातो. हिवाळ्यात सुका मेव्याची खरेदी वाढली असली तरी सुका मेवा किती प्रमाणात खावा? त्यातून काय मिळते? कोणत्या सुक्या मेव्यात काय न्यूट्रीशनल गुणधर्म आहेत? याविषयी फारशी सजगता नसते. वाळलेल्या फळांसह बदाम, काजू, अक्रोड अशा वेगवेगळ्या सुक्या मेव्यात किती प्रमाणात ऊर्जा,कर्बोदके, फायबर, सारख, चरबी आणि कॅलरिज, प्रथिने असतात? जाणून घेऊया...

बदाम

वाईट कोलेस्ट्रॉलसह रक्तदाब,हृदयरोग आणि मधुमेहासारख्या अनेक रोगांसाठी बदाम आरोग्यदायी समजला जातो. १०० ग्रॅम बदामामध्ये काय काय गुणधर्म आहेत? पाहूया...

नाव

प्रति १०० ग्रॅम

कॅलरी

579

कर्बोदके

22g

फायबर

13g

साखर

4.4g

चरबी

50g

प्रथिने

21g

बेदाणा, मनुका

बेदाणा किंवा मनुका याचा सुक्या मेव्यात प्रामुख्याने समावेश होतो.बेदाणे किंवा मनुका या द्राक्षांना वाळवून बनवल्या जातात. प्रति १०० ग्रॅम बेदाण्यात काय आहेत गुणधर्म?

नाव

प्रति १०० ग्रॅम

कॅलरी

290 kcal

कर्बोदके

77g

फायबर

4.4g

साखर

62.3

चरबी

0.22g

प्रथिने

3.43g

जर्दाळू

वाळलेले जर्दाळू बेकींग,शिजवलेल्या पाककृतींमध्ये प्रामुख्याने वापरला जातो.१०० ग्रॅम जर्दाळूमध्ये काय पोषक गुणधर्म आहेत? जाणून घेऊया..

नाव

प्रति १०० ग्रॅम

कॅलरी

241

कर्बोदके

62.6g

फायबर

7.3g

साखर

53.4g

चरबी

0.31g

प्रथिने

3.39g

सुके खोबरे

सुक्या खोबऱ्याचा वापर फार पूर्वीपासून भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये केला जातो. त्यातील तेलापासून चोथ्यापर्यंत पुरेपूर व आरोग्यदायी फायदे आपण जाणतोच.  १०० ग्रॅम सुक्या खोबऱ्यात काय काय  आरोग्यदायी गुणधर्म आहेत जाणून घेऊ..

नाव

प्रति १०० ग्रॅम

कॅलरी

660

कर्बोदके

23.6g

फायबर

16.3g

साखर

7.35g

चरबी

64.5g

प्रथिने

8.87g

खारीक

खजूराचे सुके स्वरूप म्हणजे खारीक. प्रामुख्यानं आफ्रीका आणि आखाती प्रदेशांमध्ये आढळणारं हे पीक. खजूर जेंव्हा ताजा असतो तेंव्हा त्याच्या ओलसर, गोड गुणधर्मांसाठी ओळखला जातो. खजूरातील पाणी काढलं की त्याची खारीक होते. ज्याचा वापर डिंकाच्या लाडूसह अनेक गोड पदार्थांमध्ये हिवाळ्यात आवश्य केला जातो. १०० ग्रॅम खारकेत काय असतात पौष्टीक गुणधर्म?

नाव

प्रति १०० ग्रॅम

कॅलरी

282

कर्बोदके

75g

फायबर

8g

साखर

63.4g

चरबी

0.39g

प्रथिने

2.45g

सुकं अंजीर

उष्णकटिबंधीय प्रातांत उगवणारं अंजीर भारतात खजूरासारखंच लोकप्रीय झालं आणि सुक्या मेव्याच्या पंगतीत जाऊन बसलं. प्राचीन काळापासून अंजीराचं सेवन होत आलं आहे. भरपूर कॅल्शियम आणि लोह असणाऱ्या अंजीराची उपलब्धता कमी असल्यानं त्याला वाळवून खाल्ले जाऊ लागले. जाणून घेऊया १०० ग्रॅम सुक्या अंजीरात काय गुणधर्म असतात..

नाव

प्रति १०० ग्रॅम

कॅलरी

249

कर्बोदके

63.9g

फायबर

9.8g

साखर

47.9g

चरबी

0.93g

प्रथिने

3.3g

हेही वाचा-

१. गारवा वाढताच सुकामेव्याचा बाजार 'गरम', काजू बदामाला द्यावे लागताहेत किलोमागे....

२. ऐन हिवाळ्यात सुका मेव्याच्या दरात घट, मागणीतही झाली वाढ !

 

Web Title: Which dry fruits have what nutritional properties? Find out..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.