Lokmat Agro >शेतशिवार > भारतात सर्वाधिक सोयाबीन कोणत्या राज्यांमधून येतं? जाणून घ्या..

भारतात सर्वाधिक सोयाबीन कोणत्या राज्यांमधून येतं? जाणून घ्या..

Which states produce the most soybeans in India? Find out.. | भारतात सर्वाधिक सोयाबीन कोणत्या राज्यांमधून येतं? जाणून घ्या..

भारतात सर्वाधिक सोयाबीन कोणत्या राज्यांमधून येतं? जाणून घ्या..

जगभरात सोयाबीन उत्पादन मोठ्या प्रमाणावर केलं जातं. पण भारतात सोयाबीन कोणत्या राज्यांमधून अधिक येतं माहिती आहे? जाणून घ्या..

जगभरात सोयाबीन उत्पादन मोठ्या प्रमाणावर केलं जातं. पण भारतात सोयाबीन कोणत्या राज्यांमधून अधिक येतं माहिती आहे? जाणून घ्या..

शेअर :

Join us
Join usNext

जगभरात सोयाबीन उत्पादन मोठ्या प्रमाणावर केलं जातं. पण भारतात सोयाबीन कोणत्या राज्यांमधून अधिक येतं माहिती आहे? जाणून घ्या..

भारतीय सोयाबीन संशोधन संस्थेच्या माहितीनुसार, भारतात सर्वाधिक सोयाबीनचे उत्पादन याआधी मध्य प्रदेशमध्ये होते. आता महाराष्ट्राचा यात नंबर लागतो. देशात साधारण १३.५३ मिलीयन टन सोयाबीन होते त्यातील मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान हे तीन राज्य मिळून  ९२ ते ९३ टक्के सोयाबीन उत्पादन करतात.

देशातील ही टॉप ५ सोयाबीन उत्पादक राज्य

सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्र राज्याचा वाटा ४५.३५ टक्के झाला आहे, तर याआधी मध्य प्रदेश राज्य ४५ टक्के वाटा घेऊन पहिल्या स्थानावर होते. वास्तविक, शेतीमध्ये हे आकडे दरवर्षी बदलत राहतात. यामुळेच पीक उत्पादनाबाबत राज्यांचा क्रम बदलत राहतो. मात्र, काही पिकांमध्येही अपवाद दिसून आला आहे.  

राजस्थानातील वातावरण हे सोयाबीनसाठी पुरक असल्याने या राज्यातील शेतकरीही मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड करतात. शुष्क कोरड्या प्रदेशात तग धरू शकणारे हे पीक राजस्थानातही घेतले जाते.

कर्नाटकाची सूपीक जमीन आणि वातावरणीय बदलांना पोषक स्थिती असल्याने या राज्यातही सोयाबीन पीक घेतले जाते.  तसेच तेलंगणामध्ये उच्च प्रतीच्या सोयाबीन उत्पादनासाठी पोषक वातावरणीय स्थिती आणि मातीचा पोत चांगला असल्याने सोयाबीन उत्पादनात हे राज्यही अग्रेसर आहे.

Web Title: Which states produce the most soybeans in India? Find out..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.