Lokmat Agro >शेतशिवार > सोलापूर, धाराशिव जिल्ह्यातील कोणकोणत्या कारखान्यांना मिळाले गाळप परवाने वाचा सविस्तर

सोलापूर, धाराशिव जिल्ह्यातील कोणकोणत्या कारखान्यांना मिळाले गाळप परवाने वाचा सविस्तर

Which Sugar factories in Solapur, Dharashiv district have got sugarcane crushing licenses read in detail | सोलापूर, धाराशिव जिल्ह्यातील कोणकोणत्या कारखान्यांना मिळाले गाळप परवाने वाचा सविस्तर

सोलापूर, धाराशिव जिल्ह्यातील कोणकोणत्या कारखान्यांना मिळाले गाळप परवाने वाचा सविस्तर

साखर आयुक्तांनी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील ३२ साखर साखर कारखान्यांना गाळप परवाने दिले आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीमुळे साखर कारखाने गाळपावर परिणाम झाला आहे.

साखर आयुक्तांनी सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील ३२ साखर साखर कारखान्यांना गाळप परवाने दिले आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीमुळे साखर कारखाने गाळपावर परिणाम झाला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

अरुण बारसकर
सोलापूरः जिल्ह्यातील सिद्धेश्वर, भीमा, जयहिंद, संत दामाजी सहकारीसह पंढरपूरच्या श्री. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे गाळप परवाने साखर आयुक्त कार्यालयात पेंडिंग आहेत.

साखर आयुक्तांनी सोलापूरधाराशिव जिल्ह्यातील ३२ साखर साखर कारखान्यांना गाळप परवाने दिले आहेत. दरम्यान विधानसभा निवडणुकीमुळे साखर कारखाने गाळपावर परिणाम झाला आहे.

सोलापूर प्रादेशिक विभागातील सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील ४६ साखर कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम सुरू करण्यास परवानगी मागणी अर्ज केले आहेत.

ज्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची एफआरपी, तोडणी-वाहतूक व शासनाचे पैसे दिले आहेत त्या साखर कारखान्यांना गाळप परवाने दिले असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले. त्यामध्ये सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील ३२ साखर कारखान्यांचा समावेश आहे.

उर्वरित परवाना मागणी केलेल्या साखर कारखान्यांनी देणी दिल्याचे पत्र दिल्यानंतर गाळप परवाने दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील सात ते आठ साखर कारखान्यांचे गाळप सुरू झाल्याचे सोलापूर साखर प्रादेशिक कार्यालयाकडून सांगण्यात आले.

परवाने मिळालेले कारखाने
सोलापूर जिल्हा

विठ्ठल कार्पोरेशन म्हैसगाव, कमलाभवानी करमाळा, श्री. शंकर सहकारी माळशिरस, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील अकलूज, श्री. पांडुरंग श्रीपूर, नॅचरल शुगर, लोकमंगल अॅग्रो बीबीदारफळ, लोकनेते बाबुराव आण्णा पाटील अनगर, लोकमंगल शुगर इथेनॉल भंडारकवठे, येडेश्वरी अॅग्रो बार्शी, सिद्धनाथ शुगर तिर्हे, औताडे शुगर मंगळवेढा, विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर, विठ्ठलराव शिंदे करकंब, ओंकार शुगर चांदापुरी, युटोपियन मंगळवेढा, ओंकार पाँवर कार्पोरेशन (जुना व्हीपी शुगर), जकराया शुगर, आष्टी शुगर, सीताराम महाराज साखर कारखाना, इंदेश्वर शुगर, दि. सासवड माळीनगर, भैरवनाथ शुगर तीन कारखाने.

धाराशिव जिल्हा
लोकमंगल माउली, भैरवनाथ शुगर (तेरणा), धाराशिव सहकारी (सांगोला तालुका सहकारी), भैरवनाथ शुगर (शिवशक्ती सहकारी वाशी), धाराशिव सहकारी धाराशिव, मांजरा शुगर, भीमाशंकर शुगर, बिराजदार शुगर समुद्राळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना, धाराशिव आयान (बानगंगा)

यांचे परवाने लटकले
गोकुळ शुगर, श्री. विठ्ठल सहकारी, भीमा टाकळी सिकंदर, मातोश्री लक्ष्मी शुगर, श्री. संत दामाजी मंगळवेढा, बबनराव शिंदे शुगर, श्री. सिद्धेश्वर साखर कारखाना, श्री. संत दामाजी मंगळवेढा, श्री. कुर्मदास सहकारी, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, जयहिंद शुगर आचेगाव.

Web Title: Which Sugar factories in Solapur, Dharashiv district have got sugarcane crushing licenses read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.