गहू हे जगातील एक प्रमुख अन्नधान्याचे पीक असून त्याच्या लागवडीचे क्षेत्र व उत्पादन इतर अन्नधान्यांच्या पिकापेक्षा अधिक आहे. जगातील निम्या लोकांच्या पोषणात गव्हाला प्रमुख स्थान आहे. त्यापासून चपाती, पाव व तत्सम पदार्थ, रवा व मैदा हे पदार्थ तयार करता येतात. गहू विशेषत: उत्तर आणि दक्षिण समशितोष्ण कटिबंधातील प्रदेशांत पिकतो. जगातील
पेरणीसाठी गव्हाच्या सुधारित वाणांचा वापर झाल्यामुळे तसेच मशागतीच्या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे महाराष्ट्राचे गव्हाचे सरासरी प्रतिहेक्टरी उत्पादन ४८२ किलोवरुन १८३९ किलोपर्यंत वाढले आहे.
बागायत वेळेवर पेरणीसरबती वाण- फुले समाधान, त्र्यंबक, तपोवन, एम.ए.सी.एस. ६२२२, एम. ए. सी. एस. ६४७८.
फुले समाधानहा वाण उशिरा पेरणीसाठी फार चांगला वाण आहे. त्यामुळे या वाणाची शिफारस बागायती उशिरा पेरणीसाठी करण्यात आलेली आहे. उशिरा पेरणीसाठी ए. के. ए. डब्ल्यु - ४६२७ हा वाणसुद्धा घेऊ शकता. पाण्याची उपलब्धता कमी प्रमाणात असल्यास एन. आय. ए. डब्ल्यु - १४१५ (नेत्रावती) व एच. डी. २९८७ (पुसा बहार) या सरबती वाणांची लागवड करावी.
बन्सी बक्षी वाणएन. आय. डी. डब्ल्यु - २९५ (गोदावरी) हा बक्षी वाण बागायती वेळेवर पेरणी करण्यासाठी वापरावा. एम. ए. सी. एस. ४०२८, एम. ए. सी. एस. ४०५८.
खपली गहूखपली गव्हाची लांब अरुंद दाणे असतात आणि सामान्यतः याचा वापर रवा, खिर आणि नाश्त्याचे पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. आहारतंतूंचे प्रमाण इतर गव्हाच्या तुलनेत जास्त असते (१६ % पेक्षा जास्त). खपली गव्हाच्या खाद्यपदार्थामध्ये ग्लायकॅमिक निर्देशांक कमी असतो ज्यामुळे त्याला मधुमेहाच्या रुग्णांच्या आहारात समाविष्ट केले जाते. वाण: एम. ए. सी. एस. २९७१.
नवीन प्रसारीत वाणफुले समाधान बहुगुण गहू वाण (एन. आय. ए. डब्ल्यु. १९९४)प्रसारणाचे वर्ष : २०१६- महाराष्ट्रातील बागायती क्षेत्रात वेळेवर (१ ते १५ नोव्हेंबर) तसेच उशिरा (१५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर) पेरणीसाठी सरबती गव्हाचा समाधान (एन. आय. ए. डब्ल्यु. १९९४) हा वाण प्रसारित करण्यात आला आहे.- महाराष्ट्रातील बागायत क्षेत्रात वेळेवर किंवा उशिरा असा दोन्ही कालावधीत पेरणीसाठी एन. आय. ए. डब्ल्यु - १९९४ सरबती गव्हाचा हा एकमेव वाण आहे. वेळेवर पेरणीखाली उत्पन्न ४६.१२ क्विंटल/हेक्टर तर उशिरा पेरणीसाठी उत्पन्न ४४.२३ क्विंटल/हेक्टर.- तपोवन, एम. ए. सी. एस. ६२२२, एन. आय. ए. डब्ल्यु. - ३४ व एच. डी. - २९३२ या तुल्य व प्रचलित वाणांपेक्षा सरस.- तांबेरा रोगास तसेच मावा किडीस देखील प्रतिकारक्षम.- टपोरे व आकर्षक दाणे, हजार दाण्याचे वजन ४३ ग्रॅम, प्रथिनांचे प्रमाण १२.५ ते १३.८ टक्के, चपातीची प्रत उत्कृष्ट व प्रचलित वाणांपेक्षा सरस.- प्रचलित वाणांपेक्षा ९ ते १० दिवस लवकर येतो.
फुले सात्विक (एन.आय.ए.डब्ल्यु. ३१७०)द्विपकल्पीय विभाग (महाराष्ट्र व कर्नाटक) आणि उत्तर पश्चिम मैदानी प्रदेश विभागात संरक्षित पाण्याखाली पेरणीसाठी फुले सात्विक (एन. आय. ए. डब्ल्यु. ३१७०) हा वाण प्रसारित करण्यात आला आहे.प्रसारणाचे वर्ष : २०१९ठळक वैशिष्ट्ये:-उत्कृष्ट गुणवत्तेसाठी प्रसारित वाण.- प्रथिनांचे प्रमाण ११ ते १२ टक्के, बिस्किट स्प्रेड मानक १० पेक्षा जास्त.- दाण्याचा कडकपणा खुप कमी म्हणजे (३० ते ४५%) तसेच ब्रेड गुणवत्ता स्कोर ७.० ते ७.५० व ग्लूटेन इंडक्स ८० ते ८५ टक्के असते.- चपातीचा गुणवत्ता स्कोर हा ७.० ते ७.५ व यामध्ये लोहाचे प्रमाण हे ३५ ते ४० पीपीएम इतके असुन यामध्ये झिंक ३० ते ३५ पीपीएम आहे. तसेच हा वाण तांबेरा रोगास प्रतिकारक्षम असुन त्याची उत्पादनक्षमता ३५ ते ४० क्विंटल प्रति हेक्टरी एका ओलिताखाली इतकी आहे.
एन. आय. डी. डब्ल्यु. ११४९ प्रसारणाचे वर्ष : २०२०ठळक वैशिष्ट्ये:- द्विपकल्पीय विभागातील जिरायतीत किंवा एका ओलिताखाली (एक पाणी पेरणीनंतर ४२ दिवसांनी) वेळेवर पेरणीसाठी शिफारशीत बन्सी वाण.- तांबेरा रोगास प्रतिकारक.- शेवया, कुरड्या व पास्ता यासाठी उत्तम.- पक्व होण्याचा कालावधी ११०-११५ दिवस.- उत्पादनक्षमता ३५ ते ४० क्विंटल/हे.
वरीलप्रमाणे पेरणीच्या वेळेनुसार सुधारित वाणांचा अवलंब केल्यास निश्चित उत्पादनात वाढ होईल. पेरणीची वेळ संरक्षित पाण्याखाली घेण्यात येणाऱ्या गव्हाची पेरणी १ ते १० नोव्हेंबर मध्ये करावी. बागायती गव्हाची वेळेवर पेरणीची योग्य वेळ म्हणजे नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा होय. या कालावधीत पेरणी केल्यास गव्हाचे उत्पादन चांगले येते. बागायती गव्हाची पेरणीसुध्दा उशिरा करता येते. परंतु वेळेवर पेरणी केल्या गव्हापेक्षा उत्पादन कमी येते. बागायती गव्हाची पेरणी १५ नोव्हेंबर नंतर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरवाड्यास हेक्टरी २.५ क्विंटल उत्पादन कमी येते व त्यामुळे १५ डिसेंबर नंतर पेरलेले गव्हाचे पीक फायदेशीर ठरत नाही.