Lokmat Agro >शेतशिवार > कोरडवाहू गहू लागवडीसाठी कोणते वाण निवडाल?

कोरडवाहू गहू लागवडीसाठी कोणते वाण निवडाल?

Which variety to choose for dryland wheat cultivation? | कोरडवाहू गहू लागवडीसाठी कोणते वाण निवडाल?

कोरडवाहू गहू लागवडीसाठी कोणते वाण निवडाल?

पाऊसमान कमी झाल्यास रब्बी हंगामात पाण्याची उपलब्धता कमी होऊन गहू लागवडीखालील क्षेत्रात घट होते. अशा वेळी कमी पाण्यात येणारे वाण पेरणीसाठी फायदेशीर ठरू शकतात.

पाऊसमान कमी झाल्यास रब्बी हंगामात पाण्याची उपलब्धता कमी होऊन गहू लागवडीखालील क्षेत्रात घट होते. अशा वेळी कमी पाण्यात येणारे वाण पेरणीसाठी फायदेशीर ठरू शकतात.

शेअर :

Join us
Join usNext

महाराष्ट्रात रब्बी हंगामात गहू लागवडीखाली जवळपास ११ ते १२ लाख हेक्टर क्षेत्र असते मात्र पाऊसमान कमी झाल्यास रब्बी हंगामात पाण्याची उपलब्धता कमी होऊन गहू लागवडीखालील क्षेत्रात घट होते. अशा परिस्थितीत गहू पिकाच्या वाढीच्या विशिष्ट अवस्थेत पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकास एक, दोन किंवा तीन पाणी देऊन अपेक्षित उत्पादन मिळविता येऊ शकते. अशा वेळी कमी पाण्यात येणारे वाण पेरणीसाठी फायदेशीर ठरू शकतात.

जिरायत/कोरडवाहू आणि मर्यादित सिंचनासाठी गव्हाचे सुधारित वाण

सरबती वाण (जिरायत/कोरडवाहू)
एन.आय.ए.डब्लू. १४१५ (नेत्रावती)

परीपक्व होण्याचा कालावधी (दिवस) १०५ ते १०८
सरासरी उत्पादन (क्वि/हे.) जिराईत १६ ते १८
वैशिष्ट्ये: प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा अधिक, तांबेरा रोगास प्रतिकारक, चपातीसाठी उत्तम

सरबती वाण (मर्यादित सिंचन)
१) एन.आय.ए.डब्लू. १९९४ (फुले समाधान)

परीपक्व होण्याचा कालावधी १०५-११०
सरासरी उत्पादन (क्वि/हे.) ३५-४० (मर्यादित सिंचन)
वैशिष्ट्ये: बागायती वेळेवर तसेच उशिरा पेरणीसाठी शिफारस, मर्यादित सिंचनाखाली प्रतिसाद देणारा वाण, तांबेरा प्रतिकारक, अधिक उत्पादन क्षमता
२) फुले अनुपम (एन.आय.ए.डब्लू. ३६२४)
परीपक्व होण्याचा कालावधी १०५-११०
सरासरी उत्पादन (क्वि/हे.) ३०-३५ (एका ओलिताखाली)
वैशिष्ट्ये: नियंत्रित पाणी, वेळेवर पेरणी, तांबेरा प्रतिकारक, चपातीसाठी उत्तम
३) फुले सात्विक (एन. आय. ए.डब्लू. ३१७०)
परीपक्व होण्याचा कालावधी १०३-१०८
सरासरी उत्पादन (क्वि/हे.) ३५-४० (एका ओलिताखाली)
वैशिष्ट्ये: नियंत्रित पाणी, वेळेवर पेरणी, बिस्कीट स्प्रेड मानक १० पेक्षा जास्त, तांबेरा प्रतिकारक
४) एन. आय. ए.डब्लू. १४१५ (नेत्रावती)
परीपक्व होण्याचा कालावधी १०८ ते १११
सरासरी उत्पादन (क्वि/हे.) (मर्यादित सिंचन) २५ ते २८
वैशिष्ट्ये: प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा अधिक, तांबेरा रोगास प्रतिकारक, चपातीसाठी उत्तम

बन्सी वाण (जिरायत/कोरडवाहू)
एम.ए.सी.एस. ४०२८

परीपक्व होण्याचा कालावधी ९९-१०५
सरासरी उत्पादन (क्वि/हे.) १८-२०
वैशिष्ट्ये: प्रथिने १४.७%, जस्त ४०.३ पीपीएम, लोह ४६.१ पीपीएम, तांबेरा प्रतिकारक, शेवया, कुरड्या व पास्तासाठी उत्तमवाण

बन्सी वाण (मर्यादित सिंचन)
१) एन आय डी डब्ल्यू ११४९

परीपक्व होण्याचा कालावधी ११०-११५
सरासरी उत्पादन (क्वि/हे.) ३५-४०
वैशिष्ट्ये: नियंत्रित पाणी, वेळेवर पेरणी, तांबेरा प्रतिकारक, शेवया, कुरड्या व पास्ता यासाठी उत्तम वाण
२) एम.ए.सी.एस. ४०५८
परीपक्व होण्याचा कालावधी १०६
सरासरी उत्पादन (क्वि/हे.) २५-३०
वैशिष्ट्ये: प्रथिने १२.८%, जस्त ३७.८ पीपीएम, लोह ३९.५ पीपीएम, तांबेरा प्रतिकारक, रवा व पास्तासाठी उत्तम वाण
३) एकेडीडब्लू २९९७- १६ (शरद)
परीपक्व होण्याचा कालावधी ११०-११५
सरासरी उत्पादन (क्वि/हे.) १२-१४
वैशिष्ट्ये: चपाती व पास्ता साठी उत्तम

डॉ. सुरेश दोडके, डॉ. योगेश पाटील आणि प्रा. संजय चितोडकर
कृषि संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक

Web Title: Which variety to choose for dryland wheat cultivation?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.