Join us

कोरडवाहू गहू लागवडीसाठी कोणते वाण निवडाल?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2023 12:27 PM

पाऊसमान कमी झाल्यास रब्बी हंगामात पाण्याची उपलब्धता कमी होऊन गहू लागवडीखालील क्षेत्रात घट होते. अशा वेळी कमी पाण्यात येणारे वाण पेरणीसाठी फायदेशीर ठरू शकतात.

महाराष्ट्रात रब्बी हंगामात गहू लागवडीखाली जवळपास ११ ते १२ लाख हेक्टर क्षेत्र असते मात्र पाऊसमान कमी झाल्यास रब्बी हंगामात पाण्याची उपलब्धता कमी होऊन गहू लागवडीखालील क्षेत्रात घट होते. अशा परिस्थितीत गहू पिकाच्या वाढीच्या विशिष्ट अवस्थेत पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकास एक, दोन किंवा तीन पाणी देऊन अपेक्षित उत्पादन मिळविता येऊ शकते. अशा वेळी कमी पाण्यात येणारे वाण पेरणीसाठी फायदेशीर ठरू शकतात.

जिरायत/कोरडवाहू आणि मर्यादित सिंचनासाठी गव्हाचे सुधारित वाण

सरबती वाण (जिरायत/कोरडवाहू)एन.आय.ए.डब्लू. १४१५ (नेत्रावती)परीपक्व होण्याचा कालावधी (दिवस) १०५ ते १०८सरासरी उत्पादन (क्वि/हे.) जिराईत १६ ते १८वैशिष्ट्ये: प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा अधिक, तांबेरा रोगास प्रतिकारक, चपातीसाठी उत्तम

सरबती वाण (मर्यादित सिंचन)१) एन.आय.ए.डब्लू. १९९४ (फुले समाधान)परीपक्व होण्याचा कालावधी १०५-११०सरासरी उत्पादन (क्वि/हे.) ३५-४० (मर्यादित सिंचन)वैशिष्ट्ये: बागायती वेळेवर तसेच उशिरा पेरणीसाठी शिफारस, मर्यादित सिंचनाखाली प्रतिसाद देणारा वाण, तांबेरा प्रतिकारक, अधिक उत्पादन क्षमता२) फुले अनुपम (एन.आय.ए.डब्लू. ३६२४)परीपक्व होण्याचा कालावधी १०५-११०सरासरी उत्पादन (क्वि/हे.) ३०-३५ (एका ओलिताखाली)वैशिष्ट्ये: नियंत्रित पाणी, वेळेवर पेरणी, तांबेरा प्रतिकारक, चपातीसाठी उत्तम३) फुले सात्विक (एन. आय. ए.डब्लू. ३१७०)परीपक्व होण्याचा कालावधी १०३-१०८सरासरी उत्पादन (क्वि/हे.) ३५-४० (एका ओलिताखाली)वैशिष्ट्ये: नियंत्रित पाणी, वेळेवर पेरणी, बिस्कीट स्प्रेड मानक १० पेक्षा जास्त, तांबेरा प्रतिकारक४) एन. आय. ए.डब्लू. १४१५ (नेत्रावती)परीपक्व होण्याचा कालावधी १०८ ते १११सरासरी उत्पादन (क्वि/हे.) (मर्यादित सिंचन) २५ ते २८वैशिष्ट्ये: प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा अधिक, तांबेरा रोगास प्रतिकारक, चपातीसाठी उत्तम

बन्सी वाण (जिरायत/कोरडवाहू)एम.ए.सी.एस. ४०२८परीपक्व होण्याचा कालावधी ९९-१०५सरासरी उत्पादन (क्वि/हे.) १८-२०वैशिष्ट्ये: प्रथिने १४.७%, जस्त ४०.३ पीपीएम, लोह ४६.१ पीपीएम, तांबेरा प्रतिकारक, शेवया, कुरड्या व पास्तासाठी उत्तमवाण

बन्सी वाण (मर्यादित सिंचन)१) एन आय डी डब्ल्यू ११४९परीपक्व होण्याचा कालावधी ११०-११५सरासरी उत्पादन (क्वि/हे.) ३५-४०वैशिष्ट्ये: नियंत्रित पाणी, वेळेवर पेरणी, तांबेरा प्रतिकारक, शेवया, कुरड्या व पास्ता यासाठी उत्तम वाण२) एम.ए.सी.एस. ४०५८परीपक्व होण्याचा कालावधी १०६सरासरी उत्पादन (क्वि/हे.) २५-३०वैशिष्ट्ये: प्रथिने १२.८%, जस्त ३७.८ पीपीएम, लोह ३९.५ पीपीएम, तांबेरा प्रतिकारक, रवा व पास्तासाठी उत्तम वाण३) एकेडीडब्लू २९९७- १६ (शरद)परीपक्व होण्याचा कालावधी ११०-११५सरासरी उत्पादन (क्वि/हे.) १२-१४वैशिष्ट्ये: चपाती व पास्ता साठी उत्तम

डॉ. सुरेश दोडके, डॉ. योगेश पाटील आणि प्रा. संजय चितोडकर कृषि संशोधन केंद्र, निफाड, जि. नाशिक

टॅग्स :रब्बीपीकशेतकरीशेतीपेरणी